Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये हेमंत गोडसेंचा खेळ बिघडणार? बंडखोरांनी वाढवलं टेन्शन, महायुतीत पुन्हा धुसफूस

Lok Sabha Election 2024: नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, यामुळे नाशिकमध्ये महायुतीला बंडखोरीचं ग्रहण लागलं आहे.
Mahayuti Seat Sharing Issue
Nashik Lok SabhaYandex
Published On

Nashik Lok Sabha Election 2024

नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, यामुळे नाशिकमध्ये महायुतीला बंडखोरीचं ग्रहण लागलं आहे. कारण, हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे.

Mahayuti Seat Sharing Issue
Sanjay Raut: 'मौनी खासदारांचे समर्थन करणं मनसे प्रमुखांची मजबुरी...' संजय राऊतांचा राज ठाकरेंवर पलटवार

भाजप नेते अनिल जाधव यांनी बंडखोरी केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते निवृत्ती अरींगळे यांनी देखील बंडखोरीचं हत्यार उपसलं आहे. नाशिक लोकसभेच्या जागेसाठी अरींगळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.

माझ्या उमेदवारीबाबत मी अजित पवार यांना कल्पना दिली आहे, असं अरींगळे यांनी सांगितलं आहे. महायुतीतील दोन महत्वाच्या नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे. हे दोन्ही उमेदवार निवडणुकीत हेमंत पाटील यांचा खेळ बिघडवणार का? अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासूनच चर्चेत राहीला आहे. या मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही घटकपक्षांनी दावा केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ येथून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. याशिवाय भाजपकडून देखील या जागेवर दावा करण्यात आला होता.

तब्बल दीड महिन्यांच्या रस्सीखेचनंतर महायुतीने ही जागा शिवसेना शिंदे गटाला दिली. शिंदे गटाने या मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध दर्शविला आहे.

भाजपचे नेते अनिल जाधव यांच्या बंडखोरीनंतर आता अजित पवार गटाचे निवृत्ती अरींगळें यांनी देखील बंडखोरी केली आहे. अरींगळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून मी कुठल्याही परिस्थिती निवडणूक लढवणार, असं त्यांनी म्हटलं आहे. याबाबत आपण अजित पवार यांना कल्पना दिल्याचंही अरींगळे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, हेमंत गोडसे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. सध्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून राजाभाऊ यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. दुसरीकडे महायुतीतील पदाधिकारी बंड करत असल्याने शिंदे गटाचं चांगलंच टेन्शन वाढलं आहे.

Mahayuti Seat Sharing Issue
Sangli Loksabha News: वंचितचा पक्ष वंचितांसाठी आहे की धनदांडग्यांसाठी? प्रकाश शेंडगेंचा सवाल; विशाल पाटलांच्या पाठिंब्यावरुन टीकास्त्र

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com