Sanjay Raut: 'मौनी खासदारांचे समर्थन करणं मनसे प्रमुखांची मजबुरी...' संजय राऊतांचा राज ठाकरेंवर पलटवार

Sanjay Raut On Raj Thackeray: राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधत कोकणच्या विकासासाठी नारायण राणे यांना निवडून देण्याचे आवाहन केले. आता खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या उद्धव ठाकरेंवरील टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे.
Raj Thackeray- Sanjay Raut
Raj Thackeray- Sanjay RautSaam TV

मयुर राणे|ता. ५ मे २०२४

रत्नागिरी- सिधुदुर्ग लोकसभेचे भाजप उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कणकवली येथे जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधत कोकणच्या विकासासाठी नारायण राणे यांना निवडून देण्याचे आवाहन केले. आता खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या उद्धव ठाकरेंवरील टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवायचे आणि महाराष्ट्राचा विध्वंस आणि विनाश करणारे प्रकल्प आमच्या माथी मारायचे. आमच्या शेती, फळबागा, जमीन याचं नुकसान करायचं. सध्या मोदी- शहांचे नवीन भक्त झालेले खरोखर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत का? याचे त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे," असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

"नारायण राणे यांनी मोदींच्या मंत्रीमंडळात काय दिवे लावले? याचा खुलासा त्यांची वकिली करणाऱ्या नेत्यांनी करावा. १० पक्षांतर करुन मंत्रीपद घेणे हा विकास आहे का? बाकं बडवून मोदींना सवाल विचारणाऱ्या नेत्यांना मोदी सरकारने केलं. मौनी खासदाराचं समर्थन करणं मनसे प्रमुखांची मजबुरी आहे," अशी टीकाही यावेळी संजय राऊत यांनी केली.

Raj Thackeray- Sanjay Raut
Bear Attack : तेंदू पत्ता संकलन करणाऱ्या इसमावर अस्वलाचा हल्ला; हल्ल्यात ६० वर्षीय इसम गंभीर जखमी

"मोदी शहांनी महाराष्ट्रातील प्रकल्प पळवले. भ्रष्टाचारावर हल्ले केले. त्यावर नारायण राणेंनी तोंड उघडलं का? हे नकली अंधभक्त आहेत, उद्या त्यांची भक्ती बदलू शकते. महाराष्ट्र, मुंबईतील प्रकल्प गेले. महाराष्ट्राची सध्या लुट चालू आहे, त्यावर नारायण राणे- राज ठाकरे जोडीने तोंड उघडलं का?" असा खोचक सवालही यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केला.

Raj Thackeray- Sanjay Raut
MP Pritam Munde: भाजप संविधान बदलणार? भरसभेत खासदार प्रीतम मुंडेंनी घेतला विरोधकांचा समाचार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com