MP Pritam Munde: भाजप संविधान बदलणार? भरसभेत खासदार प्रीतम मुंडेंनी घेतला विरोधकांचा समाचार

Maharashtra Politics News: भाजप संविधान बदलणार ? या विरोधकांच्या वक्तव्यावरून खासदार प्रीतम मुंडे आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी अनेक प्रश्न करत विरोधकांचा समाचार घेतला आहे.
MP Pritam Munde
MP Pritam MundeYandex

विनोद जिरे, साम टीव्ही बीड

भाजप संविधान बदलणार? या विरोधकांच्या वक्तव्यावरून आता खासदार प्रीतम मुंडे ( MP Pritam Munde) आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी एक ना अनेक प्रश्न करत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. भाजपच्या मनामध्ये काही काळबेंद्र असतं, तर ते एवढ्या दिवस गप्प बसले असते का? २०१९ ते २०२४ मध्ये पार्लमेंटमध्ये भाजपची मेजॉरिटी आहे. ते काहीही करू शकले असते, अस वक्तव्या प्रीतम मुंडेंनी केलं आहे.

मात्र, ज्यांनी संविधानाचा सर्वात जास्त दुरूपयोग केला, ते काँग्रेस म्हणतंय संविधान बदलणार ? संविधानांने व्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य दिलं आहे. म्हणूनच काँग्रेसकडून उचलली जीभ अन लावली टाळुला, असं करत दिशाभूल केली जाते आहे. असं म्हणत भाजप खासदार प्रीतम मुंडेंनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्या बीडमध्ये मातंग समाजाच्या मेळाव्यात बोलत (Beed Politics) होत्या.

यावेळी प्रीतम मुंडे म्हणाल्या, की आज मलाच एक प्रश्न पडला आहे, विरोधी पक्षातील लोक म्हणतात की, जर भारतीय जनता पार्टी पुन्हा ४०० पार करत सत्तेत आली तर संविधान (Maharashtra Politics News) बदलतील. मग, संविधान बदलण्याची भीती ठराविक एकाच जातीला आणि एकाच समूहाला का दाखवली जाते, असा सवाल त्यांनी यावेळी विचारला आहे. संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील सर्वांना दिलं आहे, मग ते बदलल्यानंतर फक्त एकाच जातीला नुकसान कसं होईल, असा प्रश्न देखील यावेळी त्यांनी विचारलं आहे.

MP Pritam Munde
Maharashtra Politics 2024 : दानवेंची भेट नाकारल्याने मराठा आंदोलक भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट; पळशीतील तणावाचा Video समोर

मुंडे पुढे म्हणाल्या की, याचं एकच कारण आहे की. काँग्रेसची नेहमी एकच नीती राहिलेले आहे. ती म्हणजे भारतीय जनता पार्टीशी विकासावर लढता येत नाही, त्यामुळे एका जातीला एका धर्माला भीती दाखवली जात ( Pritam Munde On Congress) आहे. पूर्वी समान नागरी कायद्याविषयी उलट सुलट बोलल जात होतं. आरक्षण रद्द होईल, असं बोललं जात होतं. मात्र, समान नागरी कायद्याचा आणि आरक्षणाचा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. २०१४ ते २०२४ पुर्यंत भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रामध्ये आहे. पहिली ५ वर्षे राज्यात देखील सरकार होतं. ४०० पार झाल्यानंतर असं काय वेगळं होणार आहे ? आजही पार्लमेंटमध्ये ३०३ खासदार हे केवळ भाजपचे असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

MP Pritam Munde
Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com