Maharashtra Loksabha : डासांचा नायनाट करण्यासाठी बांधला खासदार होण्याचा चंग; गाधींच्या वेशभूषेत घेतला उमेदवारी अर्ज

Wardha Lokasabha : घराजवळील असलेल्या नाल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. रोज होणाऱ्या डासांच्या त्रासातून मुक्ती मिळावी यासाठी एका व्यक्तीने थेट खासदारकीची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय.
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionSaam Tv
Published On

(चेतन व्यास, वर्धा)

Man Filled Lok Sabha Election Candidate Nomination In Mahatma Gandhi Costumes:

सामान्य माणसांचे प्रश्न आणि वेगवेगळ्या समस्या निवडणूकीचे मुद्दे ठरतात. पण महात्मा गांधींचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यात गांधींच्या वेशभूषेत लोकसभेचा उमेदवारी अर्ज घेण्यासाठी चक्क गांधींच्या वेशभूषेत आर्वीचा गांधी म्हणून ओळख असलेला प्रकाश उर्फ टिटू मोटवानी यांनी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज विकत घेण्यासाठी आलेल्या या प्रतीकत्मक गांधीने सर्वांचे लक्ष वेधले. (Latest News)

लोकप्रतिनिधी अजूनही सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवू शकले नाही, हेच या वेशभूषेतील प्रतिकात्मक गांधींने दाखवून दिले. लोकसभेत निवडून आल्यास एक वेगळी समस्या सोडवून देऊ, असा दावा टिटू मोटवानी यांनी केलाय. ही सामन्य माणसांची सामन्य समस्या कोणती तर जिल्ह्यात असलेल्या मच्छरांचा नागरिकांना होणारा त्रास.

या ६१ वर्षाच्या टिटू मोटवानीने मच्छरांना वर्ध्यातून हद्दपार करण्याचा विडाच उचललाय. आज उमेदवारी अर्ज घेत दोन एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याच यांनी सांगितलं. यांच्याशी सामचे प्रतिनिधी चेतन व्यास यांनी संवाद साधलाय.

प्रकाश उर्फ टिटू मोटवानी हे मूळचे वर्धा जिल्ह्याच्या आर्वी येथील राष्ट्रसंत वार्डाचे रहिवासी. यांच्या घराजवळ नगरपालिकेची नाली आहे आणि त्यामुळे तेथे डासांचा त्रास त्यांना होत असतो. मोटवानी यांनी डासांच्या त्रासाने त्रस्त झाले आहेत. त्याच्यासोबतच शेजारीदेखील मच्छरामुळे त्रस्त झाले आहे. मोटवानी यांना जिल्ह्यातील ही समस्या मुख्य समस्या असल्याच लक्षात आलं आणि थेट लोकसभा निवडणुकीत उतरत डासांचा नायनाट करण्याचा त्यांनी संकल्प त्यांनी बांधलाय.

खासदार झाल्यानंतर संकल्प केला. आज त्यांनी महात्मा गांधी यांच्या वेशभूषेत वर्धेच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या गाठल्या. त्यांनी उमेदवारी अर्ज घेतलाय आणि दोन एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याच सांगितलंय. मोटवानी यांचे समोसा विक्रीची दुकान असून ते सामान्य कुटुंबातील आहेत. ६१ वर्षीय मोटवानी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

डासांचा नायनाट करण्यासाठी अचानक लोकसभा निवडणूक लढण्याचं ठरवलं पण पैसे नसल्याने मोटवानी नागरिकांकडून पैशाची जुळवाजुळव केली.आता डासांची समस्यासाठी दोन एप्रिल उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. वर्धा महात्मा गांधीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, त्यामुळे लक्ष वेधून घेणाऱ्या या वेशभूषेतील प्रतिकात्मक गांधीला लोकांची पसंती मिळेल का? हा येणार काळच ठरवेल. पण तूर्तास तरी या वेशभूषेतील गांधींनी सामान्य माणसाच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे.

Lok Sabha Election
उद्धव ठाकरेंनी देऊ केलेली उमेदवारी नाकारली, चेतन नरकेंचा कोल्हापुरातून लढण्याचा निर्धार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com