Praful Patel: प्रफुल पटेल यांना भ्रष्टाचार प्रकरणात दिलासा; CBIकडून क्लिन चीट

Praful Patel : नागरी उड्डाण मंत्री असताना एअर इंडियाला विमान देण्याच्या निर्णयात अनियमितता झाल्याचा आरोप प्रफुल्ल पटेल यांच्यावर करण्यात आला होता.
Praful Patel:  प्रफुल पटेल यांना भ्रष्टाचार प्रकरणात दिलासा; CBIकडून क्लिन चीट

CBI Give Clean Cheat To Praful Patel In Corruption Case:

सीबीआयने २०१७ सालच्या भ्रष्टाचार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रफुल पटेल यांना मोठा दिलासा दिलाय. नागरी उड्डाण मंत्री असताना एअर इंडियाला विमान देण्याच्या निर्णयात अनियमितता झाल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणात आता प्रफुल पटेल यांना दिलासा मिळालाय. सीबीआयने न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करून हा खटला बंद करण्याचा निर्णय घेतलाय.(Latest News)

कोणताही पुरावा प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्याविरोधात सापडले नसल्याचे सीबीआयने क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलंय. प्रफुल पटेल यांच्यावर २०१७ सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. काँग्रेसप्रणित ‘यूपीए-२’च्या मनमोहन सिंग सरकारमध्ये मंत्रिपदावर असताना प्रफुल पटेल यांनी भ्रष्टाचार करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

२०१७ मध्ये सीबीआयने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणी आर्थिक अनियमिततेच्या आरोपांची चौकशी सुरू केली होती. नागरी वाहतूक मंत्रालय आणि एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आता ७ वर्षांनतर सीबीआयने तत्कालीन मंत्री प्रफुल्ल पटेल आणि मंत्रालयातील तसेच एअर इंडियाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांना क्लीनचिट देण्यात आलीय.

सीबीआयने न्यायालयासमोर तपास बंद केला जात असल्याचा अहवाल सादर केलाय. दरम्यान या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू असलेले अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. तर काही पक्षांनी एनडीएमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतलाय. अशात तपास यंत्रणेकडून चोकशी थांबवत क्लीन चीट मिळाल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे.

Praful Patel:  प्रफुल पटेल यांना भ्रष्टाचार प्रकरणात दिलासा; CBIकडून क्लिन चीट
राष्ट्रवादी कॉंग्रेसला महायुतीत सामिल नव्हतं करायला पाहीजे, गोगावलेंचं धक्कादायक वक्तव्य MarathiNews

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com