Akola News : अकोल्यात बच्चू कडूंना महिलांचा घेराव; पाणी टंचाई प्रश्नावर महिला आक्रमक

Akola News : खांबोरा गावात गेल्या एक महिन्यापासून पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही. अनेकदा संबंधित तसेच ग्रामसेवक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले मात्र तोडगा निघाला नाही
Akola News
Akola NewsSaam tv

अक्षय गवळी 
अकोला
: पाणी टंचाई भेडसावत आहे. अकोला जिल्ह्यात देखील पाणीटंचाईची भीषणता असून पाणी टंचाईच्या प्रश्नावर महिला आक्रमक होताना दिसत आहे. दरम्यान (Akola) अकोल्याचे माजी पालकमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) दिसताच महिलांनी त्यांना घेराव घालत पाणीटंचाईचे निराकरण करण्याची मागणी केली.  (Breaking Marathi News)

Akola News
Lok Sabha Election : मद्य विक्री ३० टक्क्यांवर वाढल्यास परवानाधारकांची होणार चौकशी; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदेश

खांबोरा गावात गेल्या एक महिन्यापासून पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही. अनेकदा संबंधित तसेच ग्रामसेवक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले मात्र तोडगा निघाला नाही. दरम्यान अकोल्यातल्या ग्राम पाळोदी गावात एका कार्यक्रमासाठी बच्चू कडू हे जात होते. या दरम्यान उगवा फाट्यावर महिलांनी त्यांना थांबवले. आमच्या प्रश्नाचे निराकरण करा, अशी मागणी माहिलांनी केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Akola News
Dharashiv crime : चालकाची चलाखी! ATM मध्ये भरण्याऐवजी बॅंकेचे ₹ ८५ लाख घेऊन पळाला; कर्नाटकापर्यंत तपासचक्रे फिरली अन्...

पालकमंत्री नसलो तरी प्रयत्न करतो, असे आश्वासन महिलांना दिले. यावेळी त्यांनी अकोला जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावत खांबोरा गावातील (Water Scarcity) पाणी टंचाईबाबत सांगत पिण्यासाठी पाणी नाहीये. तात्पुरत्या स्वरूपात पिण्याचे पाण्याचे टँकर सुरू करावे; अशा सूचना बच्चू कडूंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com