अमर घटारे, अमरावती|ता. २५ मार्च २०२४
Bachchu Kadu Holi Celebration News :
आज देशभरासह राज्यातही धुलीवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राजकिय नेते, पुढारी मंडळीही धुलीवंदनाच्या उत्साहात सहभागी होत आहेत. अशातच लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी धुलीवंदनाच्या निमित्ताने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भिंती रंगवत अनोखी होळी साजरी केली आहे. (Maharashtra Politics News)
प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी धुलीवंदनाच्यादिनी शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भिंती रंगवत अनोख्या पद्धतीने होळी साजरी केली. बच्चू कडू यांच्या अमरावतीमधील निवासस्थानी हा अनोखा उपक्रम साजरा केला गेला. यावेळी बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणूक आली, मुद्द्यावर बोला! रंग - बेरंग झाला शेतकऱ्याचा, विद्यार्थ्यांचा, दिव्यांगांचा याकरिता प्रथम..
1) स्वामीनाथन आयोग पूर्णता स्वीकारावा 50% नफा धरून भाव काढणे किंवा पेरणी ते कापणी पर्यंत सर्व मजुरीची कामे मनरेगा मधून घ्यावे..
2) युवा धोरण - पेपर फुटीचा कायदा तातडीने मंजूर करावा..
3) शेतमजूर व प्रकल्पग्रस्त साठी वित्तीय महामंडळ निर्माण करावा..
4) दिव्यांग बांधवांना 3000 रुपये मानधन व 5% निधी केंद्र व राज्याचे बजेट मधून खर्च करावा, अशा मागण्या बच्चू कडू यांनी केल्या आहेत.
. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जळगावमध्ये गिरीश महाजनांचे होळी सेलिब्रेशन..
दरम्यान, जामनेर येथे भाजप नेते आणि ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी कार्यकर्त्यांसमवेत धुलीवंदनाचा सण साजरा केला. जामनेर येथील त्यांच्या निवासस्थानी निवासस्थानी गिरीश महाजन यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा देत पर्यावरण पूरक होळी खेळण्याचे आवाहनही यावेळी केले. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.