Maharashtra Election 2024: शरद पवार गटाची लोकसभेची दुसरी यादी जाहीर; भिवंडी, बीडमधून कोणाला मिळाली उमेदवारी?

Sharad Pawar Group Lok Sabha Candidates 2nd List Declared: राज्यातील महाविकास आघाडीमध्ये जागावाटपांचा तिढा कायम आहे. यासाठी महाविकास आघाडीमध्ये बैठकांचा धडाका सुरू आहे. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.
Sharad Pawar NCP Group News
Sharad Pawar Group's Second Lok Sabha Candidates List Announced; Who Got Nomination From Bhiwandi, and Beed Know DetailsSaam Digital
Published On

Sharad Pawar NCP Group Lok Sabha Candidates 2nd List

राज्यातील महाविकास आघाडीमध्ये जागावाटपांचा तिढा कायम आहे. यासाठी महाविकास आघाडीमध्ये बैठकांचा धडाका सुरू आहे. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. भिवंडी यांनी बीड या दोन लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बीडमधून बजरंग सोनवणे तर भिवंडीतून सुरेश म्हात्रे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे.

राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केलेल्या या यादीमध्ये वर्ध्यातून अमर काळे, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुरमधून अमोल कोल्हे , नगरमधून निलेश लंके, तसेच दिंडोरीमधून भास्करराव भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसऱ्या यादीमध्ये बीड आणि भिवंडीतील उमेदवारी आज जाहीर झाली. सातारा, रावेर, माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्यापही कायम आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sharad Pawar NCP Group News
Maharashtra Lok Sabha Election : दीर-भावजय धाराशिवच्या आखाड्यात आमनेसामने; पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात

माढात धैर्यशील मोहिते पाटीलांच्याही नावाची चर्चा

दरम्यान, शरद पवार गटाकडे माढा आणि सातारा मतदार संघ आहेत. यापैकी माढ्यामध्ये नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. माढ्यातून महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू होती, मात्र ऐनवेळी महादेव जानकरांनी महायुतीची वाट धरली. त्याचसोबत रणजित निंबाळकरांच्या उमेदवारीमुळे नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटीलांच्याही नावाची चर्चा आहे.

तसेच साताऱ्यातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता उदयनराजेंविरोधात नवा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साताऱ्यातून शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील तसेच काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे.

Sharad Pawar NCP Group News
Uday Samant: घरापर्यंत पोहचाल तर माझ्याकडे सर्वांची जंत्री; उदय सामंतांचा टीकाकरांना सज्जड इशारा (Video)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com