Maharashtra Lok Sabha Election : दीर-भावजय धाराशिवच्या आखाड्यात आमनेसामने; पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात

Lok Sabha Election 2024 : उस्मानाबाद लोकसभेसाठी आता दिर भावजय असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या समोर आता महायुतीकडून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचे आव्हान असणार आहे.
Maharashtra Lok Sabha Election
Maharashtra Lok Sabha ElectionSaam Digital

Maharashtra Lok Sabha Election

उस्मानाबाद लोकसभेसाठी आता दिर भावजय असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या समोर आता महायुतीकडून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचे आव्हान असणार आहे. त्यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून ही उमेदवारी मिळवली आहे. अर्चना पाटील यांच्या उमेदवारीने धाराशिवमध्ये पुन्हा एकदा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेली दोन घराणी आमने सामने आली आहेत. 2019 च्या निवडणुकीत ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांनी राणा जगजितसिंह पाटील यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. याचाच वचपा काढण्यासाठी आता अर्चना पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे.

महायुतीतून धाराशिवची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटली आहे. तुळापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी राष्ट्रवादीतून निवडणूक लढवावी असा प्रस्ताव अजित पवार गटाने दिला होता. मात्र राणा जगजितसिंग पाटील यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. आता त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच धाराशिवमधून त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. धाराशिवची जागा अजित पवार गटाच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे पक्षप्रवेशानंतर धाराशिवमधून अर्चना पाटील यांना उमेदवारी घोषीत करतील अशी चर्चा होती. दरम्यान अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे अर्चना पाटील विरूद्ध ओम राजे निंबाळकर यांच्यात थेट लढत होणार आहे.

Maharashtra Lok Sabha Election
सातारा मतदारसंघात महायुती, मविआचे उमेदवार का जाहीर हाेईनात? उदयनराजेंचे दिलखूलास उत्तर, 'बच्चा समझ के छाेड दिया'

तिसऱ्या टर्ममध्ये भाजपकडून मोठे निर्णय घेतले जातील

धाराशिव येथून उमेदवारी घोषित झाली आहे. नरेंद्र मोदी देशाचं नेतृत्व कणखरपणे करत आहेत. त्यांच्या नेतृत्वात भाजप ४०० पार भाजप जागा जिंकणार आहे. भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था व्हावं म्हणून मोदी काम करतील. मोठे निर्णय या टीममधून घेतले जातील. एका महिलेला राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. महिलांचा सन्मान करण्याचा संदेश राष्ट्रवादीने दिला असल्याचं त्या म्हणाल्या.

निवडणुकीत समोर कोण आहेत पाहणार नाही. कारण कोणाला हरवण्यासाठी निवडणूक लढवत नाही आहे. जनतेचे विषय सोबत आहेत. जनता विकासाला मतदान करणार आहे. माझं नाव सगळ्यात शेवटी आलंच राणा जगजितसिंग पाटील जे काम केलं पद्मसिंह पाटील यांनी जे काम केलं आहे त्यांच हे फलित आहे. माझ्या कामाचा १० टक्के वाटा देखील त्यात आहे, असं त्या म्हणाल्या आहेत.

Maharashtra Lok Sabha Election
Amaravati Politics : अमरावतीत वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठा ट्विस्ट; उमेदवार मागे घेत आनंदराज आंबेडकर यांना दिला पाठिंबा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com