Maharashtra Politics 2024 : बीड लोकसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट; मराठा आंदोलक उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

Lok Sabha Election 2024 : मराठा आंदोलनादरम्यान बीडसह माजलगावमध्ये जाळपोळ झाली होती. त्या जाळपोळ प्रकरणात आरोप असलेले मराठा आंदोलन राजेंद्र होके आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024Saam Digital
Published On

विनोद जिरे

बीड लोकसभा निवडणुकीत आता नवा ट्विस्ट पहायला मिळण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलनादरम्यान बीडसह माजलगावमध्ये जाळपोळ झाली होती. त्या जाळपोळ प्रकरणात आरोप असलेले मराठा आंदोलन राजेंद्र होके आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. बीडच्या माजलगावमध्ये पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात अधिकृत भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

या पत्रकार परिषदेत होके पाटील यांनी भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यावर पहिली तोफ डागली आहे. मराठा समाज कोणाचा गुलाम नाही तो स्वतंत्र निर्णय घेण्यास सक्षम आहे. पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे दोघांनीही काही केलं नाही. समाज जिवंत ठेवायचा असेल तर आरक्षणच मिळायलाच हवं. त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून, प्रसंगी जेलमध्ये जाऊन संघर्ष केलाय. काही पक्षांना वाटतंय मराठा समाज हा आमची मक्तेदारी आहे. आम्ही आरक्षणाच्या लढ्यासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवली आहेत. अंगावर केसेस घेतोय हे तुम्हाला आमदार, खासदार करण्यासाठी नाही, असं देखील होके पाटील यांनी म्हटलंय.

आज मराठवाड्यात सर्वात जास्त आत्महत्या मराठा समाजाच्या होत असतील. कोणत्याही पक्षाने आपण समाजाचे कैवारी असल्याची नाटकं करू नयेत. शेतीच्या बांधावर जाऊन शेतकरी पुत्र म्हणू नका आधी मदत करा. माझा आजोबा सांगायचा रेल्वे येतेय, आता मला माझ्या नातवाला सांगायची वेळ आली आहे, रेल्वे मग कधी येईल नेमकी रेल्वे कधी येणार हा प्रश्न अद्यापही कायम आहे. त्यामुळे हा राजेंद्र होके उभा राहणार आणि निवडूनही येणार. आम्ही कधी जातिवाद केला नाही सर्व समाज माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे.

Maharashtra Politics 2024
Pune lok Sabha : मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात काँग्रेसची आचारसंहिता भंगाची तक्रार

आम्ही विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर जाऊ, तुमचे प्रश्न कोण सोडवतोय त्याचा विचार करून मतदान करा, बळी पडू नका, हा ओबीसीचा, हा मराठ्याचा आहे याचा विचार करू नका, असं आवाहन त्यांनी केलं आहे. त्यामुळे होके यांच्या उमेदवारीने एक नवाच ट्विस्ट बीडच्या लोकसभा निवडणुकीत आल्याचे दिसत आहे.

Maharashtra Politics 2024
Maharashtra Election: भाजपनं १० वर्षात काय केलं? उमेदवारी अर्ज दाखल करताच प्रणिती शिंदेंची घणाघाती टीका

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com