Maharashtra Election: भाजपनं १० वर्षात काय केलं? उमेदवारी अर्ज दाखल करताच प्रणिती शिंदेंची घणाघाती टीका

Solapur Loksabha Election : राज्यातील लोकसभेच्या निवडणुकीत सोलापूरच्या लढतीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. सोलापूरमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत आहे. आज काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.
Solapur Loksabha Election Praniti Shinde
Solapur Loksabha Election Praniti Shinde

विश्वभूषण लिमये

Solapur Loksabha Election Praniti Shinde : सोलापूर: गेल्या १० वर्षात सोलापुरात भाजपने काहीच केले नाही. भाजप या मुद्द्यावर बोलत नाही. भाजपाविरोधात जनतेत रोष असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरताना केलीय. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी आपल्या शब्दांना धार देत भाजपवर हल्लाबोल सुरू केलाय.

राज्यातील लोकसभेच्या निवडणुकीत सोलापूरच्या लढतीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. सोलापूरमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत आहे. आज काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी प्रणिती शिंदे यांच्याबरोबर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. यावेळी प्रणिती शिंदे यांनी रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.

रॅलीत सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मानले आभार ते आशीर्वाद देण्यासाठी आलेत. ही निवडणूक जरी माझी असली तरी ही सर्वांची लढाई असल्याचं प्रणिती शिंदे म्हणाल्या. यावेळी त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. गेल्या दहा वर्षात सोलापुरात भाजपाने काहीच केले नाही. पण भाजप त्या मुद्द्यावर बोलत नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही सोलापुरात पाणी नाही, मात्र भाजपला या समस्यांऐवजी दुसरेच मुद्दे उपस्थित करत आहे. भाजपाने गेल्या दोन वर्षांत उजनीच्या पाण्याचा प्रश्न का सोडवला नाही, जनतेत भाजपविरोधात रोष आहे.

यावेळी प्रणिती शिंदे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यावरही हल्लाबोल केलाय. राम सातपुते यांनी माझ्याशी विषयांतर करू नये. ही माझी लढाई आहे तुम्ही माझ्यासोबतच लढा, इशाराच त्यांनी सातपुतेंना दिलाय. दोन्ही माजी खासदार तुमच्यासोबत काही लाज वाटते का त्यांना ? असा सवालही त्यांनी केलाय.

असा आहे सोलापूर मतदारसंघाचा इतिहास

१९५२ मध्ये सोलापूर लोकसभा मतदार संघाची स्थापना झाली. तेव्हापासून अनेक वर्षे या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिलंय. पण २०१४ पासून भाजपची या मतदारसंघात सत्ता आहे. दरम्यान २००९ मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर हा राखीव मतदारसंघ म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हा सुशीलकुमार शिंदे निवडून आले. पण २०१४ च्या मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला आणि त्याठिकाणी भाजपच्या शरद बनसोडे या नवख्या उमेदवाराचा विजय झाला होता. तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपकडेच आहे. २०१९ मध्ये भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे निवडून आले. त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांचाच पराभव केला होता.

Solapur Loksabha Election Praniti Shinde
Madha Loksabha: काय सांगता! लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी चक्क रेड्यावरुन एन्ट्री; माढ्यातील उमेदवाराची जिल्ह्यात चर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com