Maharashtra Lok Sabha Election
Maharashtra Lok Sabha ElectionSaam Digital

Maharashtra Lok Sabha Election: महाराष्ट्र काँग्रेसचे नेते तातडीने पोहोचले दिल्लीत; बैठकीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या

Lok Sabha Election 2024 : आघाडीतील एकाही पक्षाने अद्याप उमेदवारी जाहीर केलेले नाही. अशातच काँग्रेस नेत्यांची राजधानी दिल्लीत महत्त्वाची बैठक सुरू असून आजच काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला महाराष्ट्रातील काँग्रेस नेते उपस्थित आहेत.
Published on

Maharashtra Lok Sabha Election

लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजताच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे आघाडीतील एकाही पक्षाने अद्याप उमेदवारी जाहीर केलेले नाही. अशातच काँग्रेस नेत्यांची राजधानी दिल्लीत महत्त्वाची बैठक सुरू असून आजच काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला महाराष्ट्रातील काँग्रेस नेते उपस्थित आहेत.

काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे. बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील उपस्थित उपस्थित आहेत. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होण्यापूर्वी नेत्यांची बैठक सुरू असून राज्यांतील उमेदवारांच्या नावाबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

 महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) जागावाटपाबाबत बैठकांवर बैठक सुरु आहेत. मात्र अद्याप जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याची माहिती मिळत आहे. ४-५ जागांवर पेच कायम आहे. एकीकडे ही स्थिती असताना उद्धव ठाकरे मात्र आपल्या उमेदवारांची घोषणा करत आहेत. त्यामुळेच काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याची माहिती आहे.

Maharashtra Lok Sabha Election
'माढा'चा तिढा वाढला! महायुतीचा धर्म पाळा, रामराजे नाईक निंबाळकरांना नेत्यांच्या कानपिचक्या, राजेंनीही ठणाकवून सांगितलं कार्यकर्त्यांशी चर्चा करेन (video)

सांगलीच्या जागेवरुन काँग्रेस- ठाकरे गटात वाद!

दरम्यान, सांगली लोकसभेच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहेत. सांगली लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची घोषणा करण्यात आली आहे, मात्र याठिकाणी काँग्रेसचे विशाल पाटील इच्छुक आहेत. तसेच कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडणार नसल्याचा इशारा विश्वजित कदम यांनी दिला आहे, त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. 

Maharashtra Lok Sabha Election
Maharashtra Lok Sabha Election : शिंदे गटाच्या तीन विद्यमान खासदारांना मिळणार डच्चू? १२ जागांवरील संभाव्य उमेदवारांची नावं जाहीर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com