Maharashtra Election Result Prediction: लोकसभा निवडणुकीतील राज्यातील 10 बिग फाइट्स, कोण मारणार बाजी?

Maharashtra Lok Sabha Election 2024: Result Prediction of Main Important Constituncies | लोकसभा निवडणूक २०२४ साठी राज्यात ५ टप्प्यांमध्ये मतदान झाले. राज्यात अनेक राजकीय नेत्यांसाठी ही निवडणूक चुरशीची ठरली. या निवडणुकीत कोणत्या मतदारसंघात कोण बाजी मारणार हे ४ जूनला समजेल.
Maharashtra Election 2024 Result Prediction: लोकसभा निवडणुकीतील राज्यातील 10 बिग फाइट्स, कोण मारणार बाजी?
Maharashtra Lok Sabha Election Main Candidates To Look ForSaam TV

महाराष्ट्रामध्ये ४८ लोकसभा मतदार संघांसाठी पाच टप्प्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. १९ एप्रिल ते २० मे या कालावधीमध्ये महाराष्ट्रात ५ टप्प्यामध्ये मतदान झाले. या लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election 2024) महाराष्ट्रातील काही मतदारसंघामध्ये चुरशीची लढत झाली. राज्यातील अनेक नेत्यांसाठी ही निवडणूक खूपच प्रतिष्ठेची होती. आता सर्वांचे लक्ष लागले आहे निवडणुकीच्या निकालाकडे. येत्या ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे कोणत्या मतदारसंघात कोण बाजी मारणार हे लवकरच कळणार आहे. राज्यामधील काही मतदारसंघ असे आहेत या मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली. याठिकाणी बिग फाइट्स झाल्या त्या नेमक्या कोणत्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत...

Maharashtra Election 2024 Result Prediction: लोकसभा निवडणुकीतील राज्यातील 10 बिग फाइट्स, कोण मारणार बाजी?
Loksabha Election 2024 Result: लोकसभा निवडणुकीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

शिरूर लोकसभा मतदारसंघ -

शिरुर लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीमध्ये चुरशीची लढत झाली. या मतदारसंघामध्ये महायुतीने शिंदे गटातून अजित पवार गटामध्ये आलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवडणूक लढणयाची संधी दिली. तर महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हेंनी निवडणूक लढवली. या दोघांमध्ये तगडी लढत झाली. दोन्ही नेत्यांनी जोरदार प्रचार केला आता नेमका फायदा कोणाला होतोय आणि खासदारकी कोणाकडे जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघ -

बारामती लोकसभा निवडणूक शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांनी निवडणूक लढवली. तर महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली. या मतदारसंघामध्ये दोन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांच्या प्रचारसभा झाल्या. ही निवडणूक शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी झाली. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात अतिशय चुरशीची लढत झाली. आता कोण बाजी मारेल हे लवकरच कळेल.

सांगली लोकसभा मतदारसंघ -

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात जास्त चर्चेत राहिला तो म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी होती. त्यामुळे विशाल पाटील यांनी ही निवडणूक अपक्ष लढवली. तर महायुतीकडून संजयकाका पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे या मतदार संघात तिरंगी लढत झाली. आता या मतदारसंघात कोण खासदार होईल हे ४ जूनला कळेल.

कल्याण लोकसभा मतदारसंघ -

कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून खासदार श्रीकांत शिंदे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. तर महाविकास आघाडीकडून वैशाली दरेकर यांनी निवडणूक लढवली. या मतदारसंघामध्ये आपला उमेदवार जिंकून यावा यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार ताकद लावण्यात आली होती. या मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे पुन्हा खासदार होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Election 2024 Result Prediction: लोकसभा निवडणुकीतील राज्यातील 10 बिग फाइट्स, कोण मारणार बाजी?
Loksabha Election: सरकार येताच एका महिन्यात तुमच्या बँक खात्यात टाकणार ८५०० रुपये: राहुल गांधींची घोषणा

नाशिक लोकसभा मतदारसंघ -

नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये दोन शिवसैनिकांमध्ये लढत झाली. या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी निवडणूक लढवली. तर महायुतीकडून शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी निवडणूक लढवली. राजाभाऊ वाजे यांच्यासाठी महाविकास आघाडीने जोरदार प्रचार केला. या मतदारसंघात राजाभाऊ वाजे यांना जास्त मत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी देखील या ठिकाणी कोण खासदार होईल हे लवकरच कळेल.

सातारा लोकसभा मतदारसंघ -

साताऱ्यामध्ये महायुतीकडून उदयनराजे भोसले यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे करण्यात आले होते. उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये चुरशीची लढत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. उदयराजे भोसले यांच्यासाठी स्वत: पीएम मोदी यांनी सभा घेतली होती. शशिकांत शिंदे यांच्यासाठी देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा झाल्या होत्या. आता या मतदारसंघात कोण बाजी मारतेय हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Maharashtra Election 2024 Result Prediction: लोकसभा निवडणुकीतील राज्यातील 10 बिग फाइट्स, कोण मारणार बाजी?
Loksabha Election: सत्तेच्या खुर्चीवर कोण होणार विराजमान? लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यात होणार क्लिअर, जाणून घ्या कसं?

अहमदनगर लोकसभा मतदारसंघ -

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे-पाटील आणि महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे नेते निलेश लंके यांच्यामध्ये प्रमुख लढत झाली. या मतदारसंघात सुजय विखे-पाटील हे खासदार होते. तर निलेश लंके हे आमदार आहेत. निलेश लंके यांनी या मतदारसंघामध्ये चांगली कामं केली आहेत. त्यामुळे त्यांना निश्चितच या मतदारसंघात चांगला फायदा होईल. पण या मतदारसंघात खासदार होण्यासाठी कोणाला जास्त मत मिळाली हे ४ जूनलाच कळेल.

बीड लोकसभा मतदारसंघ -

बीड लोकसभा मतदारसंघ देखील यावेळी खूप चर्चेत राहिला. या मतदारसंघात महायुतीकडून पंकजा मुंडे यांना पहिल्यांदाच खासदारकीचे तिकीट देण्यात आले. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे यांनी निवडणूक लढवली. पंकजा मुडे आणि बजरंग सोनावणे यांच्यात थेट लढत झाली. या मतदारसंघात पंकजा मुंडे यांचे जास्त वर्चस्व असल्यामुळे त्याच विजयी होतील असे बोलले जात आहे.

Maharashtra Election 2024 Result Prediction: लोकसभा निवडणुकीतील राज्यातील 10 बिग फाइट्स, कोण मारणार बाजी?
Lok Sabha Election Exit Polls: एक्झिट पोलचे अंदाज आतापर्यंत किती खरे, किती चुकीचे ठरले? सविस्तर माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ -

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीकडून खूप उशिरा उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली होती. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिंदे गटाचे नेते गजानन किर्तीकर यांचा मुलगा अमोल किर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली. तर महायुतीकडून रवींद्र वायकर यांनी निवडणूक लढवली. या दोन्ही उमेदवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप असून त्यांच्या चौकशा सुरू आहेत. या दोन्ही नेत्यांच्या प्रचारासाठी पक्षाने ताकद पणाला लावली होती. अशात कोण विजयी होईल हे लवकरच समजेल.

अमरावती लोकसभा मतदारसंघ -

अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्यामध्ये जोरदार लढत झाली. या मतदारसंघामध्ये नवनीत राणा पुन्हा खासदार होणार की नाही हे येत्या ४ जून रोजी समजेल. तरी देखील या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांचे पारडे जास्त जड असल्याचे मानले जात आहे.

Maharashtra Election 2024 Result Prediction: लोकसभा निवडणुकीतील राज्यातील 10 बिग फाइट्स, कोण मारणार बाजी?
Madha Loksabha: अर्रर्र... माढ्यात ११ बुलेटची पैज लावणाऱ्या मोहिते पाटील समर्थकांची ऐनवेळी माघार; नेमकं कारण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com