Lok Sabha Election Exit Polls: एक्झिट पोलचे अंदाज आतापर्यंत किती खरे, किती चुकीचे ठरले? सविस्तर माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

India Lok Sabha Election 2019 Exit Polls Information: लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर अनेक संस्थाकडून एक्झिट पोलचे अंदाज जाहीर करण्यात येतात. त्यानुसार लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया झाल्यानंतर १ जूनला सायंकाळी एजन्सीकडून जाहीर होतील.
Lok Sabha Election Exit Polls: एक्झिट पोलचे अंदाज आतापर्यंत किती खरे, किती चुकीचे ठरले? सविस्तर माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
Lok Sabha Exit Polls AccuracySaam tv
Published On

मुंबई: लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्पा आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान १ जून रोजी आहे. १९ एप्रिल ते २५ मेपर्यंत सहा टप्प्याचं मतदान पार पडलं आहे. सातव्या टप्प्याची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्वांची नजर ५४२ जागांवरील निकालावर असणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. त्याच्याआधी १ जून रोजी सायंकाळी वेगवेगळ्या एजन्सीकडून एक्झिट पोलचे अंदाज समोर येणार आहेत.

Lok Sabha Election Exit Polls: एक्झिट पोलचे अंदाज आतापर्यंत किती खरे, किती चुकीचे ठरले? सविस्तर माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
Exit Poll vs Opinion Poll: एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलमध्ये काय आहे फरक? जाणून घ्या

२०१९ साली एक्झिट पोलचे अंदाज भाजपला बहुमत दर्शवत होते. एक्झिट पोलमध्ये एनडीएला प्रचंड बहुमत दाखवण्यात आलं होतं. तर काँग्रेससाठी एक्झिट पोल फारसे आशादायी नव्हते. २०१९ साली इंडिया आघाडीची स्थापना झालेली नव्हती. विरोधी पक्ष यूपीए अंतर्गत निवडणुकीला सामोरे गेले होते. काही पक्ष हे यूपीएचे भाग नव्हते.

दोन एक्झिट पोलमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना ३०० पार जागा दाखवल्या होत्या. या अंदाजमध्ये काँग्रेसला तीन आकडी जागा देखील दाखवण्यात आल्या नव्हत्या. तर यूपीएला देखील १०० हून अधिक जागा दाखवण्यात आल्या नव्हत्या. २०१९ साली एक्झिट पोलमध्ये १०० ते १२० जागांचा अंदाज दाखवण्यात आला होता. या पोलमध्ये भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष दाखवण्यात आला होता. तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस पक्ष होता.

कोणत्या संस्थेने काय अंदाज दर्शवला होता?

न्यूज-२४ चाणक्यच्य पोलमध्ये एनडीएला ३५० जागा दाखवल्या होत्या. तर यूपीएला ९५ जागा आणि इतर पक्षांना ९७ जागा दाखवल्या होत्या. न्यूज-१८ एप्सॉस पोलमध्ये एनडीएला ३३६ जागा दाखवल्या होत्या. यूपीएला ८२ जागा दाखवल्या होत्या. तर इतर पक्षांना १२४ जागा दाखवण्यात आल्या होत्या.

टाइम्स नाऊ-वीएमआरने एनडीएला ३०६ जागा दाखवल्या होत्या. यूपीएला १३२ जागा दाखवल्या होत्या, तर इतर पक्षांना १०४ जागा दाखवल्या होत्या. न्यूज नेशनने एक्झिट पोलमध्ये एनडीएला २८२ ते २९० जागा दाखवल्या होत्या. तर यूपीएला ११८ ते १२६ जागा दाखवल्या होत्या. तर इतर पक्षांना १३० ते १३८ जागा दाखवल्या होत्या.

इंडिया टीव्ही-सीएनएक्सच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला ३०० जागा दाखवल्या होत्या. यूपीएला १२० आणि इतर पक्षांना १२२ जागा दाखवल्या होत्या. न्यूज एक्सला एनडीएने सर्वाधिक कमी म्हणजे २४२ जागा दाखवल्या होत्या. यूपीएला १६२ जागा दाखवल्या होत्या. तर इतर पक्षांना १३६ जागा दाखवल्या होत्या.

मागच्या निवडणुकीचा निकाल कसा लागला?

२०१९ लोकसभा निवडणूक ही सात टप्प्यात पूर्ण झाली. या लोकसभा निवडणुकीत खुल्या गटासाठी ४११, अनुसूचित जाती - ८४, अनुसूचित जमाती - ४७ जागा राखीव होत्या. तामिळनाडूच्या वेल्लोरमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्यानंतर निवडणूक आयोगाने तेथील निवडणूक रद्द केली होती. या निवडणुकीवेळी एकूण ९१.०५ कोटी मतदार नोंदणीकृत होते. २०१९ साली लोकसभा निवडणुकीत ६७.०९ टक्के मतदान झालं. यामध्ये पुरुषांनी ६७.०१ टक्के मतदान केलं. तर महिलांनी ६७.१८ टक्के मतदान केलं. इतरमध्ये १४.५८ टक्के मतदान झालं होतं.

Lok Sabha Election Exit Polls: एक्झिट पोलचे अंदाज आतापर्यंत किती खरे, किती चुकीचे ठरले? सविस्तर माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
Lok Sabha Election 2024 : इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं; सोनिया, राहुल गांधींचं मतदान काँग्रेसला नाहीच!

२०१९ साली लोकसभा निवडणुकीचे ५४२ जागांवरील निकाल २३ मे २०१९ रोजी घोषित करण्यात आले. २०१९ सालचे एक्झिट पोलमध्ये जवळपास खरे ठरले. २०१९ साली लोकसभा निवडणुकीत भाजपने ३०३ जागा जिंकल्या. तर काँग्रेसने ५२ जागा जिंकल्या. तृणमूल काँग्रेसचे २२, बसपा १०, भाकप २, माकप ३, एनसीपीने ५ जागा जिंकल्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० मे २०१९ रोजी वाराणसीचे खासदार नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com