Maharashtra Politics: मराठी उमेदवार मिळत नसेल तर मुंबईतल्या 3 जागा बिनविरोध करा; शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांची फडणवीसांना पत्राद्वारे मागणी

Lok Sabha Election 2024: मुंबईतल्या तीन जागा बिनविरोध करा, अशी मागणी शरद पवार गटाचे प्रवक्ते अँड निलेश भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत केली आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSaam Tv

Maharashtra Politics:

>> सुनील काळे

मुंबईतल्या तीन जागा बिनविरोध करा, अशी मागणी शरद पवार गटाचे प्रवक्ते अँड निलेश भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत केली आहे. अलीकडेच सुरतमध्ये भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली. याचाच उल्लेख करत त्यांनी मराठी उमेदवार मिळत नाही म्हणून, मुंबई मध्ये दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई व उत्तर मध्य मुंबई या तीन जागा बिनविरोध करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

निलेश भोसले यांनी पत्रात काय लिहिलं?

देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात निलेश भोसले म्हणाले आहेत की, ''६ लोकसभा मतदार संघ असलेल्या मुंबई मध्ये भारतीय जनता पार्टी मार्फत उत्तर मुंबई व ईशान्य मुंबई या २ लोकसभा मतदारसंघात तुमच्या पक्षाने २ अ - मराठी म्हणजेच गुजराती उमेदवार दिले आहेत. हा निर्णय तुमच्या पक्षाचा असल्याने त्यावर आम्ही भाष्य करणे उचित ठरणार नाही.''

Devendra Fadnavis
Maharashtra Politics: विधानसभेत काँग्रेस- ठाकरे गट वेगळे लढणार, प्रकाश आंबेडकर यांचं भाकीत

ते म्हणाले आहेत की, ''मुंबई मध्ये लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर होऊन देखील तुमच्या पक्षाला मराठी उमेदवार मिळत नसल्याचे कळते. अशा परस्थिमध्ये कोणी तरी कोणताही उमेदवार देण्या पेक्षा, सुरत लोकसभा प्रमाणे मुंबई मधील दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई व उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ निवडणूक बिनविरोध करण्याबाबत आपणास विनंती करत आहे.''

भोसले म्हणाले, ''मुंबई मध्ये दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई व उत्तर मध्य मुंबई ह्या ३- लोकसभा मतदार संघात निवडणुक बिनविरोध केल्यास शासनाच्या यंत्रणेवर येणारा खर्च व ताण मोठ्या प्रमाणात वाचेल याची खात्री वाटते.''

Devendra Fadnavis
Maharashtra Politics 2024 : ...तर आम्ही मदत केली असती; हिना गावित यांच्या भेटनंतरही शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांची नाराजी कायम

त्यांनी पुढे लिहिलं आहे की, ''मुंबई मध्ये दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई व उत्तर मध्य मुंबई या ३- लोकसभा मतदार संघात निवडणुक बिनविरोध केल्यास शासनाच्या यंत्रणेवर येणारा खर्च व ताण मोठ्या प्रमाणात वाचेल याची खात्री वाटते.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com