विश्वभूषण लिमये साम टीव्ही, सोलापूर
माजी आमदार रमेश कदम सोलापूर लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी एमआयएमच्या नेत्यांशी उमेदवारी संदर्भात रमेश कदम यांची झाली होती चर्चा. मात्र, एमआयएम आणि रमेश कदम (Ramesh Kadam) यांच्यातील चर्चा अद्याप ही अपूर्णच आहे. त्यामुळे आता सोलापूरमधील तिरंगी लढत टळणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
उमेदवारीसंदर्भात एमआयएमकडून अद्याप कोणताही प्रतिसाद नाही, 28 एप्रिलला सभा घेऊन जाहीर करणार राजकीय भूमिका, असं माजी आमदार रमेश कदम यांनी सांगितलं आहे. सोलापूर लोकससभेसाठी अर्ज दाखल (Former MLA Ramesh Kadam) करण्याची 19 एप्रिल पर्यंतची मुदत आहे. मात्र, रमेश कदम 28 तारखेला घेणार सभा आहेत.
काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूकीची लढत राम सातपुते, प्रणिती शिंदे आणि राम कदम यांच्यात रंगणार अशी चिन्हे होती. परंतु आता माजी आमदार रमेश कदम माघार घेण्याची शक्यता वर्तविली जात (Solapur Lok Sabha Election) आहे. माध्यमांशी बोलताना राम कदम म्हणाले की, एमआयएमने त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करून ही निवडणूक मी लढवावी, अशी इच्छा माझ्याकडे व्यक्त केली होती.
मी 8 वर्ष कथित घोटाळ्याच्या आरोपत तुरुंगात होतो. ही गोष्ट देखील तुम्ही लक्षात घ्या, असे मी त्यांना म्हणालो होतो, अशी माहिती रमेश कदम यांनी दिली होती. मला देखील माझ्या कार्यकर्त्यांशी आणि माझ्याशी संपर्कात असलेल्या सर्वपक्षीय (Lok Sabha Election) वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करायची आहे, म्हणून मी वेळ घेतला होता, असं त्यांनी सांगितलं आहे.
28 एप्रिल रोजी रमेश कदम मोहोळमध्ये सभा घेणार आहे. तिथेच मी पुढची राजकीय भूमिका जाहीर करेन, असं त्यांनी सांगितलं आहे. एमआयएमकडून अद्याप कोणताही प्रतिसाद आलेला नाही. माझं देखील (Maharashtra Politics) कार्यकर्त्यांशी बोलणं सुरु आहे. उमेदवारी संदर्भात निर्णय घेऊन मला कळवा, मी चार दिवसात निरोप देईन असे त्यांना सांगितलं होतं, असंही यावेळी बोलताना रमेश कदम म्हणाले आहेत.
माजी आमदार रमेश कदम 8 वर्ष कथित घोटाळ्याच्या आरोपत तुरुंगात होते. अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील कथित घोटाळ्याप्रकरणी ते तुरुंगात होते. रमेश कदम राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी आमदार होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात (Maharashtra Election) आले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.