ex servicemen prashant kadam to contest satara loksabha election 2024
ex servicemen prashant kadam to contest satara loksabha election 2024saam tv

Satara Constituency : आजी माजी सैनिक संघटनेचा साता-यात निवडणुक लढण्याचा निर्धार, उमेदवारही ठरला

या मतदारसंघातून भाजपचे खासदार उदयनराजे भाेसले यांनी निवडणुक लढविण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. या मतदारसंघातून महायुतीचा मीच उमेदवार असणार असा आत्मविश्वास उदयनराजेंनी बुधवारी कराड येथे व्यक्त केला.

- संभाजी थाेरात

Karad :

सातारा लोकसभा मतदरासंघात (satara lok sabha constituency) माजी सैनिकाने निवडणुक लढवावी असा निर्धार आज (गुरुवार) कराड (karad) येथे जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांच्या संघटनांच्या बैठकीत करण्यात आला. या बैठकीत सर्वांनुमते सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत कदम यांना माजी सैनिकांनी उमेदवार म्हणून निश्चित केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत कदम माध्यमांशी बाेलताना म्हणाले सैनिकांच्या प्रश्न सुटावेत यासाठी निवडणुक लढविण्याचा निर्धार आजी माजी सैनिकांच्या सर्व संघटनांनी केला आहे. आमची लढाई काेणाच्या विराेधात नाही. सैनिकांच्या हक्कासाठी आमची लढाई आहे. मला उमेदवार म्हणून घाेषीत केले असून या निवडणुकीत मी सातारा मतदारसंघातून निश्चित विजयी हाेईन असेही कदम यांनी नमूद केले.

ex servicemen prashant kadam to contest satara loksabha election 2024
Gadchiroli–Chimur Lok Sabha Constituency : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात 165 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क, 85,100 वर्ष वयाच्या आजींही मतदानात आघाडीवर

दरम्यान सातारा लाेकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दूसरीकडे या मतदारसंघातून भाजपचे खासदार उदयनराजे भाेसले यांनी निवडणुक लढविण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. या मतदारसंघातून महायुतीचा मीच उमेदवार असणार असा आत्मविश्वास उदयनराजेंनी बुधवारी कराड येथे बाेलताना व्यक्त केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

ex servicemen prashant kadam to contest satara loksabha election 2024
Raghunathdada Patil : जनहितासाठी नऊ जागांवर लाेकसभा निवडणुक लढणार, रघुनाथदादा पाटलांनी मतदारसंघही घाेषीत केला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com