बालाजी सुरवसे, साम प्रतिनिधी
धाराशिव मतदारसंघात ओमराजे निंबाळकर यांनी इतिहास घडवलाय. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा पराभव केलाय. विजय मिळाल्यानतंर हा विजय उद्धव ठाकरे यांच्या परिश्रमाच हे यश असल्याचं ओमराजे निंबाळकर म्हणालेत.
निवडणूक आयोगाच्या अखेरच्या अपडेटनुसार,ओमराजे निंबाळकर यांना ३ लाख २८ हजार ८९८ मते मिळाली. दरम्यान रेकॉर्ड ब्रेक विजयानंतर ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया देताना अर्चना पाटील यांना टोला लगावला. जनतेने मनावर घेतल्यावर राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना माननारा हा मतदारसंघ आहे. लोकशाही मार्गाने तयार झालेले पक्ष,शिवसेना,राष्ट्रवादी कॉग्रेस फोडले गेले हे लोकांना गृहीत धरुन केलेले राजकारण आवडले नाही त्याच हे उत्तर आहे. उद्धव ठाकरे यांच्या परिश्रमाच हे यश असल्याचं ओमराजे म्हणालेत.
मोदींच्या सभेनंतरही पराभव
धाराशिव मतदारसंघाततील सहापैकी पाच (औसा, उमरगा, तुळजापूर, परंडा आणि बार्शी) या पाच मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. धाराशिवची एकमेव जागा महाविकास आघाडीकडं आहे. दरम्यान अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या मतदारसंघात सभांचा धडाका लावला होता. इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील अर्चना पाटील यांच्यासाठी सभा घेतली होती. या सर्व प्रयत्नानंतरही महायुतीला ही जागा आपल्याकडं खेचण्यात अपयश आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.