Exclusive: चंद्रपूरमध्ये मतदान केंद्रावर काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा, प्रतिभा धानोरकर यांच्या नावापुढे कॅन्सल शिक्का मारल्याचा दावा

Chandrapur Loksabha Election 2024: मतदान केंद्रावर उमेदवारांच्या लावलेल्या यादीवर काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या नावापुढे कॅन्सल असा शिक्का मारण्यात आल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले.
Congress Workers Protest
Congress Workers Protest Saam TV

संजय तुमराम, चंद्रपूर

चंद्रपूरमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. अशामध्ये चंद्रपूरमधील हिंदी सिटी हायस्कूलमधील मतदान केंद्रावर राडा झाल्याची घटना समोर आली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर राडा केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी राडा केल्यामुळे मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

मिळालेल्या माहितीनुसार, मतदान केंद्रावर उमेदवारांच्या लावलेल्या यादीवर काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या नावापुढे कॅन्सल असा शिक्का मारण्यात आल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हिंदी सिटी हायस्कूल मतदान केंद्रावर चांगलाच राडा केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत पक्षपात केला जात असल्याचा आरोप केला.

Congress Workers Protest
Lok Sabha 2024: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, निवडणूक अर्ज दाखल करताच अमित शहा कडाडले

काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी नेमका काँग्रेस उमेदवाराच्या नावावरच कॅन्सलचा शिक्का कसा मारला, असा सवाल केला. तसंच त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली. अचानक झालेल्या या गोंधळाने मतदान केंद्रावर काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मतदान केंद्रावर धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Congress Workers Protest
Supriya Sule: 'मी नात्याचा आणि पदाचा सन्मान केला, पण...', सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत

काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या नावापुढे कॅन्सल शिक्का मतदान केंद्र प्रमुखांनी मारला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संबंधित बूथ प्रमुखाला नोटीस दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या नावापुढे कॅन्सल शिक्का मतदान केंद्र प्रमुखांनी मारला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संबंधित बूथ प्रमुखाला नोटीस दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Congress Workers Protest
Madha Loksabha: शरद पवारांनी रात्रीत सूत्रे फिरवली! अनिकेत देशमुखांचे बंड थंड; उत्तम जानकरही आज 'तुतारी' हाती घेणार

दरम्यान, आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी २१ राज्यांतील १०२ मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण ५ मतदारसंघांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लोकसभेसाठी मतदान सुरू आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघामध्ये भाजपकडून राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. तर काँग्रेसने या मतदारसंघातून दिवंगत खासदार बाळू धानोकर यांची पत्नी आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये मुनगंटीवार विरुद्ध धानोरकर असा सामना रंगणार आहे.

Congress Workers Protest
Amit Shah: मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्रच घेऊ : अमित शाह

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com