चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांनी २ लाख ६० हजार ४१० इतक्या विक्रमी मताधिक्याने विजय मिळविलाय. धानोरकर यांनी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केलाय.
चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांनी २ लाख ६० हजार ४१० इतक्या विक्रमी मताधिक्याने विजय मिळविलाय. धानोरकर यांनी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला.
एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीत धानोरकर यांनी १० हजारांपेक्षा अधिक मतांची आघाडी घेतली आणि ही आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली. दुसऱ्या फेरीत धानोरकर २४ हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर होत्या. दहाव्या फेरीत त्यांची आघाडी १ लाख ४ हजार १५३ मतांवर गेली. विजयाच्या दिशेने आगेकुच सुरू असल्याचे कळताच धानोरकर मतमोजणी केंद्रावर दाखल झाल्या.
तर भाजप उमेदवार मुनगंटीवार मतमोजणी केंद्रावर आलेच नाही. प्रत्येक फेरीत धानोरकर यांची आघाडी वाढत असल्याने मतमोजणी केंद्रावरील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला . मग शेवटच्या २८ व्या फेरीत धानोरकर यांची मतांची आघाडी २ लाख ५९ हजार ६९२ इतकी झाली. ‘पोस्टल बॅलेट’च्या मोजणीनंतर धानोरकर २ लाख ६० हजार ४०६ मतांनी विजयी झाल्या.
प्रतिभा धानोरकर यांची विजयी मिरवणूक
चंद्रपूरच्या विजयी उमेदवार काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. अडीच लाखांचे दणदणीत मताधिक्य घेत त्यांनी भाजप नेते आणि विद्यमान मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला. सायंकाळी सात वाजता विजयी प्रमाणपत्र घेतल्यानंतर चंद्रपूर शहरातून त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली
ढोलताशे आणि डीजे तालावर कार्यकर्ते ठेका धरत विजयाचा आनंद घेत होते. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करीत ही मिरवणूक गांधी चौकात विसर्जित करण्यात आली. एका रथावर काँग्रेस नेत्यांसोबत प्रतिभा धानोरकर यांनी स्वार होत लोकांना अभिवादन केले. प्रतिभा धानोरकर यांच्यापूर्वी त्यांचे पती सुरेश धानोरकर 2019 च्या निवडणुकीत विजयी झाले होते, पण कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे पक्षाने यावेळी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.