Chandrapur Lok Sabha Result: सुधीर मुनगंटीवार यांना धक्का! एक्झिट पोलने वाढवलं भाजपचं टेन्शन; काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर बाजी मारणार?

Maharashtra Election 2024 Result: Sudhir Mungantiwar VS Pratibha Dhanorkar From Chandrapur Constituency | लोकसभा निवडणुकांच्या निकालाआधी समोर आलेल्या एक्झिट पोलने अनेक दिग्गजांची झोप उडवली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लढवलेली चंद्रपूर लोकसभेची जागाही धोक्यात येण्याची शक्यता आहे.
Chandrapur Lok Sabha: सुधीर मुनगंटीवार यांना धक्का! एक्झिट पोलने वाढवलं भाजपचं टेन्शन; काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर बाजी मारणार?
Election Battle Between Sudhir Mungantiwar VS Pratibha DhanorkarSaam TV
Published On

चंद्रपूर, ता. २ जून २०२४

लोकसभा निवडणुकांचे अंतिम आणि सातव्या टप्प्यातील मतदान शनिवारी पार पडले. या मतदानानंतर विविध वृत्त संस्थांद्वारे लोकसभा निवडणुकांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलमधून अनेक दिग्गजांना धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लढवलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचा निकालही विरोधात जाताना दिसत असून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर बाजी मारण्याची शक्यता आहे.

चंद्रपूर लोकसभेची निवडणूक राज्यातील लक्षवेधी लढतींपैकी एक मानली जाते. याठिकाणी २०१९च्या निवडणुकीत दिवंगत नेते बाळू धानोरकर यांच्यामुळे काँग्रेसची एकमेव जागा निवडून आली होती. मात्र त्यांच्या निधनानंतर याठिकाणी काँग्रेस पक्षाने बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली.

भारतीय जनता पक्षाकडून चंद्रपूरमध्ये ऐनवेळी सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली. निवडणूक लागल्यापासून याठिकाणी प्रतिभा धानोरकर या बाजी मारतील, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत होते. तशाच पद्धतीचे कल आता एक्झिट पोलमधूनही समोर आले आहेत. काल समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार हे पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजपच्या दिग्गजांना धक्का बसण्याची शक्यता आहे.

Chandrapur Lok Sabha: सुधीर मुनगंटीवार यांना धक्का! एक्झिट पोलने वाढवलं भाजपचं टेन्शन; काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर बाजी मारणार?
Loksabha Election Exit Poll: भाजप ३७० पेक्षा जास्त जागा जिंकणार; भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचा दावा

दरम्यान, चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाने दिग्गज नेत्यांची फौज मैदानात उतरवली होती. याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही झंझावती सभा पार पडली होती. मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी महिलांबाबत केलेल्या एका वक्तव्याने मोठा वाद झाला होता. त्यानंतर त्यांना माफीही मागावी लागली होती. थोडक्यात ऐनवेळी दिलेली उमेदवारी आणि प्रचारातील अतिआत्माविश्वासामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्या हातातून ही जागा जाण्याची शक्यता आहे.

Chandrapur Lok Sabha: सुधीर मुनगंटीवार यांना धक्का! एक्झिट पोलने वाढवलं भाजपचं टेन्शन; काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर बाजी मारणार?
Maharashtra Politics: 'मोदी सत्तेत येतील याचा २ दिवस आनंद घ्या' निवडणुकांच्या एक्झिट पोलवरुन काँग्रेसचा भाजपला टोला!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com