Akola Loksabha: अकोल्यात भाजपचे शक्तीप्रदर्शन! अनुप धोत्रेंनी भरला अर्ज; अभय पाटील अन् प्रकाश आंबेडकरांना देणार टक्कर

Anup Dhotre News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अकोला, वाशिम जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Anup Dhotre News:
Anup Dhotre News:Saamtv

अक्षय गवळी, अकोला|ता. ३ एप्रिल २०२४

Akola Loksabha Constituency News:

अकोला लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रेंनी आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे. मोठे शक्तिप्रदर्शन करत अनुप धोत्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अकोला, वाशिम जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Maharashtra Loksabha Election)

अकोल्यात भाजप उमेदवार अनूप धोत्रेंचा (Anup Dhotre) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याआधी अकोल्यातल्या भाजप कार्यलयापासून एका रथाद्वारे भाजपचे अनूप धोत्रे यांचं हे शक्ति प्रदर्शन करत मोठी रॅली काढली. भाजप कार्यालयपासून सुरू झालेली ही यात्रा जूना तहसील मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि नामांकन अर्ज भरला आहे. अब की बार 400 पार'मध्ये आपलाही समावेश असणार, असा विश्वासही अनूप धोत्रेंनी व्यक्त केला.

या रॅलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आमदार संजय कुटे, राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल यांच्यासह महायुतींच्या नेत्यांनी मोठ्या संख्येनं या रैलीत सहभाग घेतला होता.

Anup Dhotre News:
Vijender Singh Joins BJP: काँग्रेसला धक्का! बॉक्सर विजेंद्र सिंगचा भाजपमध्ये प्रवेश; लोकसभेच्या रिंगणात उतरणार?

अकोला लोकसभा (Akola Loksabha) निवडणूक अतिशय रंजक होणार आहे. अकोल्यात काँग्रेसने डॉ. अभय पाटील हा तगडा उमेदवार जाहिर केला आहे. वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर स्वतः मैदानात उतरले आहेत.

त्यामुळे अकोला लोकसभेची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे. याआधी 2004, 2009, 2014 आणि 2019 या चारही लोकसभा निवडणुकीत संजय धोत्रे यांनी दणदणीत विजय मिळवला होता. यंदा आजारपणामूळे संजय धोत्रे त्यांच्या एवजी त्यांचेचं सुपुत्र अनूप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Anup Dhotre News:
Scorching Summer In Bhandara : भंडारा जिल्ह्यात तापमानात वाढ, घराबाहेर पडताना अशी घ्या काळजी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com