

Eye Leaser Treatment : हल्ली लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण मोबाइल स्क्रीनचा अतिवापर करतो. चालताना प्रवास करताना किंवा रिकाम्या वेळी जणू तो आपला सवगंडीच आहे असे प्रत्येकाला वाटू लागते.
स्मार्टफोनच्या वापरामुळे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. याचा वापर अधिक केल्यास आपल्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो. ज्यामुळे आपल्याला नेत्रशस्त्रक्रिया करावी लागू शकते.
प्रगती, कार्यक्षमता आणि आरोग्यसेवा (Health) तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे, रुग्णांच्या जीवनाचा दर्जा वाढविण्याच्या कामी डॉक्टर्सची मदत करणे या मुद्दयांशी आपली बांधिलकी जपणाऱ्या ZEISS वैद्यकीय तंत्रज्ञान संस्थेने भारतात (India) SMILE (स्मॉल इन्सिजन लेन्टिक्युल एक्ट्रॅक्शन) तंत्रज्ञानाच्या स्वीकारामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे पाहिले आहे. दृष्टीदोषांवरील उपचारात एक नवा बदल घडवून आणणारी आणि कमीत-कमी छेद घेऊन पार पाडली जाणारी व्हिजन करेक्शन प्रक्रिया ZIESS SMILE (स्मॉल इन्सिजन लेन्टिक्युल एक्ट्रॅक्शन) भारतीय बाजारपेठेत वेगाने विस्तारत असल्याचे दिसत आहे व त्यामुळे वक्रीभवनामुळे निर्माण होणाऱ्या दृष्टीदोषावर उपचार करून अधिक सुस्पष्ट नजर मिळविण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती घडून आली आहे.
ZEISS SMILE लेझर नेत्रशस्त्रक्रियेच्या (Eye Surgery) क्षेत्रामध्ये आलेल्या एका क्रांतिकारी बदलाचे नाव आहे, जो रुग्णांच्या मायोपिया (निकटदृष्टिता) आणि एस्टिग्मॅटिझम सारख्या सर्वत्र आढळणाऱ्या नेत्रसमस्यांसाठी एक विश्वासार्ह आणि अचूक उपाय देऊ करतो. ZEISS SMILE चे अनोखे फायदे आणि परिवर्तनकारी लाभ यांमुळे २००८ साली ही पद्धती भारतीय बाजारपेठेत उपलब्ध झाल्यापासून नेत्रचिकित्सक आणि रुग्ण दोघांमध्येही या पद्धतीला व्यापक लोकप्रियता आणि स्वीकृती मिळाली आहे. भारतात गेल्या १० वर्षांमध्ये २००,००० हून अधिक डोळ्यांवर ZEISS SMILE प्रक्रियेद्वारे यशस्वी उपचार केले गेले आहेत. जागतिक पातळावर ZEISS ने ८० लाखांहून अधिक SMILE प्रक्रियांची सोय केली आहे.
1. ZEISS SMILE तंत्रज्ञानाची ठळक वैशिष्ट्ये आणि फायदे:
1. किमान छेद घेऊन केली जाणारी प्रक्रिया:
ZEISS SMILE साठी एक सूक्ष्म, सर्वसाधारणपणे सुमारे 2 मिमी चा छेद घ्यावा लागतो त्यामुळे ही एक कमीत-कमी छेद घेऊन केली जाणारी व फ्लॅपलेस लेझर नेत्रशस्त्रक्रिया ठरली आहे. यामुळे गुंतागुंतींचा धोका कमी होण्यास मदत होते आणि रुग्णाला लवकरात लवकर बरे होता येते.
2. अधिक चांगली सुरक्षा:
या प्रक्रियेमध्ये फेमटोसेकंद लेझर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, ज्यामुळे अचूकतेने आणि हवारपणे शस्त्रक्रिया पार पाडली जाते. सुरक्षेची उच्च पातळी जपणाऱ्या ZEISS SMILE प्रक्रियेची सर्व प्रकारच्या व्यवसायांतील, जीवनशैली जगणारी मंडळी, विशेषत: सुरक्षा आणि लष्करातील कर्मचारी, सर्व स्तरांतील खेळाडू, फॅशन क्षेत्रातील व्यक्ती, विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी आणि भावी वधू यांसारख्या सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी साजेशी शस्त्रक्रिया म्हणून व्यापक स्तरावर दखल घेतली गेली आहे.
3. रुग्ण झटपट पूर्ववत होण्याची हमी:
पारंपरिक LASIK प्रक्रियेच्या तुलनेत ZEISS SMILE प्रक्रियेमध्ये रुग्णाला अधिक लवकर बरे होण्याचा अनुभव येतो. अनेक रुग्णांनी तर शस्त्रक्रियेनंतर तत्काळ चांगले दिसू लागल्याचा अनुभव नोंदवला आहे.
4. उच्च दर्जाची अचूकता:
ZEISS SMILE मध्ये अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान वापरले जाते, ज्यामुळे नेत्रचिकित्सकांना अपवादात्मकरित्या अचूक आणि केलेल्या अंदाजानुसार नेमकेपणाने नेत्रदोष दूर करता येतात.
5. ड्राय आयच्या घटनांची शक्यता कमी:
ZEISS SMILE मध्ये कॉर्नियल फ्लॅप निर्माण करण्याची गरज नसते, त्यामुळे डोळे कोरडे होण्याच्या लक्षणांची शक्यता कमी होते, यामुळे रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर अधिक आराम अनुभवास येतो.
अशाप्रकारे ZEISS SMILE अधिकाधिक लोकप्रियता मिळवत असतानाच, नेत्रदोष दूर करण्याच्या क्षेत्रातील लक्षणीय प्रगतीचे प्रतिनिधित्वही करत आहे. या प्रक्रियेची अचूकता, सुरक्षा आणि शस्त्रक्रियेतून पूर्ववत होण्यासाठी लागणारा कमीत-कमी वेळ यामुळे वक्रीभवनाच्या दोषांसाठी विश्वासार्ह आणि परिणामकारक उपायाच्या शोधात असलेले नेत्रचिकित्सक आणि रुग्ण या दोघांसाठीही ही एक अनिवार्य निवड ठरली आहे. भारतामध्ये आणि जगभरात या प्रक्रियेचे वाढते प्रमाण आणि स्वीकार पाहता ZEISS SMILE सुस्पष्ट दृष्टी मिळविण्याच्या पद्धतीचा नवा आकार देत आहे आणि असंख्य व्यक्तींच्या जीवनमानाचा दर्जा सुधारत आहे, असे म्हणता येईल.
ZEISS SMILE तंत्रज्ञान व्यापक स्तरावर उपलब्ध व्हावे आणि या क्षेत्रातील रुग्णांना जास्तीत-जास्त चांगले परिणाम मिळावेत यासाठी भारतीय नेत्रचिकित्सकांच्या निकट संपर्कात राहून काम करण्याप्रती ZEISS वैद्यकीय तंत्रज्ञान विभाग कटिबद्ध आहे.
अग्रगण्य नेत्रचिकित्सकांशी, प्रतिष्ठित क्लिनिक्स आणि आय सेंटर्सशी सहयोग साधत नेत्रदोष दूर करणाऱ्या या अद्ययावत तंत्रज्ञानाचे फायदे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविणे हे ZEISS चे लक्ष्य आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.