Yulu Helps Control Pollution : युलुमुळे मुंबईकरांची ट्राफिकमधून सुटका, सुकर प्रवासासोबत पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी मिळेतय मदत

Mumbai Traffic : कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या प्रत्येक मुंबईकरांना ट्राफिकचा सामना करावा लागत असताना युलुने महत्त्वाचे पाऊल उचलेले.
Yulu Helps Control Pollution
Yulu Helps Control PollutionSaam Tv
Published On

Yulu E-bikes :

मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात सध्या पर्यावरणमुक्त जागरुकतेला अधिक प्राधान्य दिले जात आहे. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या प्रत्येक मुंबईकरांना ट्राफिकचा सामना करावा लागत असताना युलुने महत्त्वाचे पाऊल उचलेले.

युलुच्या इलेक्ट्रिक सायकल्स (ई-बाइक्स) आणि इलेक्ट्रिक स्कूटर्सने मुंबईकराचे लक्ष वेधून घेतले. तसेच मुंबईतील कामावर जाणाऱ्या आणि स्वतंत्र व्यवसाय करु पाहाणाऱ्यांना युलुची मदत मोठ्या प्रमाणात होते आहे.

Yulu Helps Control Pollution
Bike Transport by Train : ट्रेनमधून बाईक पार्सल करायची आहे? कशी कराल? भाडे किती आकारले जाईल? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

बेंगळुरु स्थित युलु हा इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्ट अप आहे. याचा अधिक वापर हा शहरी भागात मोठ्या प्रमाणात होत असून सुलभ आणि पर्यावरणाची हानी होण्यापासून वाचवत आहे. अशातच वाहतूकीची होणारी कोंडी, प्रदूषण (Pollution) आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी देखील याचा मोठया प्रमाणात फायदा होतो आहे.

२५ वर्षीय सेफ्टा मॅनेजर अभिजीत वायदांडेनी त्यांच्या याबाबत अनुभव शेअर केला आहे ते म्हणातात की, कामावर वेळेवर (Time) पोहोचण्यासाठी वांद्रे स्टेशन ते बीकेसीपर्यंत पोहचताना प्रचंड ट्राफिकला सामोरे जावे लागायचे. परंतु, युलुमुळे हा प्रवास (Travel) अधिक सुकर आणि सुलभ झाला आहे.

Yulu Helps Control Pollution
Biggest Ganesh Murti In Mumbai : मुंबईतली सर्वात उंच गणेशमूर्ती पाहिलीत का?

युलुची सुलभता सोयीस्कर असल्यामुळे ती इतर कंपन्यांच्या तुलनेत वरचढ ठरेल. कोणत्याही वेळी कोणीही युलुची बाईक पिक करु शकतो तसेच स्मार्टफोनचा वापर करुन बाइक अनलॉक करु शकतो. प्रवासाचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो. यासाठी कोणत्याही इतर अॅप्सची गरज लागणार नाही. भल्या मोठ्या लांबलांब रांगामध्ये उभी राहाण्याची देखील गरज नाही.

एमएमआरडीएमध्ये २८ वर्षीय सागर ऑफिस बॉस म्हणून कामाला आहे. अतिरिक्त कमाईसाठी सुट्टीच्या दिवशी युलु डीईएक्‍स राइडर बनतो आणि फूड डिलिव्‍हरीचे काम करतो. त्यांने अनुभव शेअर करताना सांगितले की, युलुमुळे मुंबईकराचा प्रवास सुकर होतो आहे. तसेच पर्यावरणाची हानी देखील कमी होतेय.

Yulu Helps Control Pollution
White Hair Problem : खोबरेल तेलात हा पदार्थ मिसळून लावा, पांढरे केस होतील काळेभोर

तसेच लांब लचक रांगेत शेअरिंग ऑटोसाठी ईएफसी येथील टेक्निशियन बनिश चौधरी यांना उभे राहावे लागत होते. पंरतु आता शेअर ऑटोपेक्षा होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत युलुसाठी प्रतिराइड २० ते २५ रुपये खर्च येतो.

प्रत्येक मुंबईकर कामावर पोहोचण्याचा प्रयत्न करतो. ईएफसी येथील फॅसिलिटी असिस्टण्ट रणजीत मोरे वक्‍तशीर असल्‍यामुळे त्‍याच्‍या क्‍लायण्‍ट्सचा दिवस देखील उत्तम जातो. ते म्हणतात की, मी युलुसोबत राइड करायला लागलो आणि कामावर लवकर पोहोचत आहे.

मुंबईला गोंगाटमुक्त आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी होणारी ही क्रांती महत्त्वपूर्ण आहे. इंधनावर चालणारी ही ई-बाइक्स आणि ई-स्कूटर वेळेचा आणि पैशांची बचत करते आहे. तसेच पर्यावरण्याचे जतन करण्यासाठी देखील योगदान देते आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com