भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. दररोज येथूल लाखो लोक प्रवास करतात. खरेतर ट्रेनचा प्रवास जितका सुकर तितकाच तो अधिक त्रासदायक आहे. लाखो लोकांच्या कामाची सुरुवात ही ट्रेनने होते. अनेकांच्या खिशाला परवडणारी व सहज-सोपी अशी वाहतुक म्हणजे रेल्वे.
ट्रेनच्या प्रवासाव्यतिरिक्त कधीकधी आपल्याला एका शहरातून दुसऱ्या शहरात असाच प्रवास करावा लागतो. जर तुम्हाला ट्रेनने बाईक किंवा सायकल आणायची असेल तर ती आणू शकतो का? त्यासाठी किती पैसे मोजावे लागतात? जाणून घेऊया प्रोसेस कशी असते.
भारतीय रेल्वे (Indian Railway) कुरिअरच्या मदतीने तुम्ही तुमचा माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज पाठवू शकता. भारतीय रेल्वेद्वारे तुमची बाइक कशी पार्सल करू शकता हे जाणून घेऊया त्याचे नियम (Rules) काय आहेत आणि प्रक्रिया काय आहे...
आपण भारतीय रेल्वेद्वारे कोणत्याही मालाची दोन प्रकारे वाहतूक करू शकता. पहिले म्हणजे तुम्ही ते सामान किंवा पार्सल म्हणून वाहून नेऊ शकता. प्रवासादरम्यान तुम्ही तुमचे सामान तुमच्यासोबत घेऊन जात आहात. त्याच वेळी, दुसरा मार्ग म्हणजे आपण ते पार्सल म्हणून वाहतूक करू शकता. पार्सल म्हणजे तुम्ही वस्तूंसह प्रवास (Travel) करत नसून ते एखाद्या ठिकाणी पाठवत आहात.
ट्रेनने बाईक पार्सल करण्यासाठी तुमच्या जवळच्या रेल्वे स्टेशनवर जा. तेथे तुम्हाला पार्सल काउंटरवर पार्सलशी संबंधित सर्व माहिती दिली जाईल. माहिती मिळाल्यानंतर, तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रे तयार करावी लागतील. दस्तऐवजांच्या फोटो आणि कागदपत्रे दोन्ही आपल्याजवळ ठेवा, कारण पडताळणीच्या वेळी त्यांच्या मूळ प्रती आवश्यक असू शकतात. पार्सल कन्फर्म झाल्यानंतर तुमच्या बाईकच्या टाकीत पेट्रोल आहे की नाही हे तपासले जाईल, त्यापूर्वी ते पेट्रोल खाली करून घ्या
बाईक पाठवण्याच्या किमान एक दिवस आधी तुम्हाला बुकिंग करावी लागेल.
बाईक नोंदणी प्रमाणपत्र आणि त्याच्या विम्याची कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
यासोबतच तुमचे ओळखपत्र जसे की, आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी देखील जोडले जातील.
बाईकचे पॅकिंग चांगले असावे, विशेषतः हेडलाईट चांगले झाकलेले असावे.
बाईक पार्सल करण्यापूर्वी सर्व पेट्रोल बाहेर काढा. जर वाहनात पेट्रोल असेल तर त्यासाठी तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल.
रेल्वेने माल पाठवताना वजन आणि अंतरानुसार भाडे मोजले जाते. पार्सलचे शुल्क सामानाच्या तुलनेत स्वस्त आहे. जर बाईक 500 किमी दूर पाठवायची असेल, तर त्यासाठी सरासरी मालवाहतूक रु. 1200 (अंदाजे) आहे. यासोबतच बाईक पॅकिंगचे शुल्क देखील जोडले जाईल, जे 300 ते 500 रुपयांपर्यंत असू शकते.
वाहनाची नोंदणी तुमच्या नावावर नसली तरीही तुम्ही तुमच्या ओळखपत्राने वाहन बुक करू शकता. मात्र, बाईकची RC आणि विम्याची कागदपत्रे नक्कीच आवश्यक आहेत. रेल्वे स्टेशनवर पार्सलचे बुकिंग फक्त सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत केले जाते. पण, तुम्ही केव्हाही सामान बुकिंग करू शकता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.