IRCTC Fake App Alert : IRCTC चा ग्राहकांना इशारा! बनावट रेल्वे अॅपद्वारे लोकांची फसवणूक, काय घ्याल काळजी

IRCTC warns users of fake IRCTC apps :केरळमधील एका वृद्धाची ४ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याची बातमी गेल्या आठवड्यात समोर आली होती.
IRCTC Fake App Alert
IRCTC Fake App AlertSaam tv
Published On

IRCTC Fake App : भारतात सगळ्यात सोपी व सोयीस्कर मानली जाणारी सुविधा म्हणजे रेल्वे. रेल्वे ही सर्वसामान्यांना परवडणारी व लाखो लोकांचे जीवनरेषा. गावी जाण्यासाठी आपण तिकीट बुक करतो. तिकीट बुक करण्यासाठी आपण रेल्वेच्या IRCTC अॅपचा वापर करतो.

परंतु, सध्या IRCTC अॅपवरुन अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. अशी एक बातमी समोर आली आहे. केरळमधील एका वृद्धाची ४ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याची बातमी गेल्या आठवड्यात समोर आली होती. तिकीट रद्द करण्यासाठी सदर व्यक्तीने गुगलवर रेल्वेची वेबसाईट सर्च केली व तेथून हॅकर्सला पैसे लुटण्याची संधी मिळाली. या प्रकरणाची बातमी कळताच IRCTC ने ग्राहकंना सर्तकतेचा इशारा दिला आहे. बनावट अॅपद्वारे लोकांची फसवणूक होत आहे पंरतु याबाबत कंपनीने कोणताही उलगडा केला नाही परंतु सर्तकतेचा इशारा दिला आहे.

IRCTC Fake App Alert
Indian Railway Rules: गणपतीत कोकणात जायचा प्लान करताय? लोअर बर्थ सीट कशी मिळेल? जाणून घ्या रेल्वेचा नियम

IRCTC ने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे, प्रिय ग्राहक, एक बनावट मोबाईल अॅप मोहीम चालवली जात आहे. यासाठी हॅकर्स IRCTC Rail Connect अॅप डाउनलोड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात संदेश पाठवून फसवत आहेत. लोकांना विनंती करण्यात आली आहे की त्याला बळी पडू नका. फक्त IRCTC चे अधिकृत Rail Connect मोबाईल अॅप वापरा. ते Google Play Store किंवा Apple App Store वरून डाउनलोड करा. या संदर्भात तुम्हाला काही मदत हवी असल्यास care@irctc.co.in वर लिहा किंवा IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर (www.irctc.co.in) दिलेल्या नंबरवर कॉल करा.

1. यापूर्वीही सर्तकतेचा इशारा

याआधी देखील IRCTC कडून असाच इशारा देण्यात आला होता. यानंतर काही वेळातच केरळमध्ये ज्येष्ठ नागरिकासोबत फसवणूक झाल्याची बातमी समोर आली. IRCTC ने मागील चेतावणीमध्ये असेही म्हटले होते की बनावट रेल्वे (Railway) अॅप्सच्या लिंक सगळीकडे पसरवत आहेत आणि त्यांच्याद्वारे लोकांची फसवणूक केली जात आहे.

IRCTC Fake App Alert
Smallest Hill Station Near Mumbai : मुंबईजवळचं नयनरम्य, पण सगळ्यात छोटं हिल स्टेशन, घरी यावंसंच वाटणार नाही!

2. केरळमध्ये एका व्यक्तीची फसवणूक कशी झाली?

ही फसवणूक केरळच्या एम. मोहम्मद बशीरसोबत घडली आहे. तिकीट रद्द करण्यासाठी त्याने गुगलवर सर्च केल्यावर त्याला एक वेबसाइट दिसली. ती बनावट वेबसाइट होती पण बशीरने त्यावर क्लिक केले. यानंतर त्याला हॅकर्सचा फोन आला आणि त्यांनी बशीरला रेस्ट डेस्क नावाचे बनावट अॅप डाउनलोड करायला लावले. या अॅपद्वारे त्याने बशीरच्या फोनमधून सगळा डेटा हॅक केला आणि त्याच्या बँकेतून सुमारे ४ लाख एफडी रुपये काढून घेतले. यावर पोलिसांचे असे मत आहे की, सदर हॅकर्स हा बिहार किंवा पश्चिम बंगालमधील असू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com