New Delhi: हिंदू पंचागानुसार, देशात १४ जून रोजी योगिनी एकादशी आहे. हिंदू धर्मात या एकदशीला खूप महत्व आहे. या दिवशी भगवान विष्णु आणि देवी लक्ष्मी यांची उपासना केली जाते. (Latest Marathi News)
सनातन शास्त्रानुसार, एकादशीचं व्रत केल्यावर भगवान विष्णु यांची कृपा होते. त्यांच्या आशीर्वादामुळे व्यक्ती सुखी समाधानी होतो. एकादशीच्या दिवसाला काही इतर प्रकारे देखील पूजा केली जाते. या दिवसाला घरात तीन वस्तू आणल्यास सुख आणि समृद्धी मिळते. तुम्हाला सुख, शांती आणि धन प्राप्ती करायची असेल तर नक्की हा उपाय करून पाहा.
घरात या तीन वस्तू आणा
सनातन शास्त्रात भगवान विष्णु यांच्या २४ अवताराचा उल्लेख आहे. या अवतारात हंसावताराचा सामावेश आहे. अनादिकाळात भगवान विष्णु यांनी सनकादि ऋषिंना ज्ञान देण्यासाठी हंसाचा अवतार घेतला होता. यामुळे योगिनी एकादशीच्या दिवशी घरात हंसाची प्रतिमा घरात आणावी. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी येईल.
तुम्हाला आर्थिक चणचण भासत असेल तर, तुम्ही एकादशीच्या दिवशी घरात पांढऱ्या रंगाच्या हत्तीची प्रतिमा आणा. अनादिकाळात भगवान विष्णु हे त्यांचा भक्त जय याच्या रक्षणाकरिता पृथ्वीवर प्रकट झाले होते. यानंतर भगवान विष्णु यांनी भक्त जयचं संरक्षण केलं होतं. भगवान विष्णु यांना गज म्हणजे हत्ती खूप प्रिय आहे. यामुळे एकादशीला पांढऱ्या हत्तीची प्रतिमा घरी आणणं शुभ मानलं जातं.
भगवान श्रीकृष्ण यांना विविध नावाने ओळखले जाते. भगवान कृष्ण यांना कन्हैया, मुरली, मनोहर, श्याम, केशव, द्वारकाधीश, वासुदेव या नावांनी ओळखले जाते. भगवान श्रीकृष्ण आणि भगवान विष्णु हे एकच अवतार आहे.
भगवान श्रीकृष्ण यांना बासरी वाजवण्यास खूप आवडायचे. यामुळे एकदशीच्या दिवशी बासरी देखील घरी आणावी. बासरीला धार्मिक मान्यता आहे की, बासरीच्या ध्वनीमुळे घरातील नकारत्मक शक्ती दूर होतात.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. आमचा उद्देश केवळ माहिती देण्याचा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.