Yoga for Cold & Cough : सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय? ही योगासने करा, मिळेल झटक्यात आराम

Cold & Cough : सर्दी आणि खोकल्याच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी योगा कसा फायदेशीर आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच, तर जाणून घेऊया. काही खास योगासने आणि प्राणायामच्या माध्यमातून बंद झालेले नाक उघडता येते.
Yoga for Cold & Cough
Yoga for Cold & CoughSaam Tv
Published On

Yoga Tips :

बदलत्या ऋतूमध्ये, सर्दी आणि खोकल्याची समस्या खूप सामान्य आहे, जी कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना सर्वात जास्त त्रास देते. त्यामुळे जर तुम्हालाही हिवाळ्यात सर्दी झाली असेल तर काही खास योगासनांच्या मदतीने तुम्ही त्यापासून आराम मिळवू शकता.

योगाच्या माध्यमातून फक्त सर्दीच नाही तर अनेक प्रकारच्या अ‍ॅलर्जी (Allergies) टाळता येतात. आपली रोगप्रतिकारक शक्ती बळकट करण्यासाठी योगासने देखील खूप उपयुक्त आहेत. सर्दी आणि खोकला टाळण्यासाठी आयुर्वेदात अनेक घरगुती उपाय आहेत, ज्यामुळे या समस्येपासून लवकर आणि कोणत्याही दुष्परिणामाशिवाय आराम मिळू शकतो.

अनुलोम-विलोम

सर्दीच्या समस्येपासून लवकर आराम हवा असेल तर अनुलोम-विलोम खूप फायदेशीर आहे. ज्याचा सराव खूप सोपा आहे. नाकाच्या दोन्ही बाजूंनी आळीपाळीने श्वास घेण्याच्या आणि सोडण्याच्या प्रक्रियेला अनुलोम-विलोम प्राणायाम म्हणतात. यामुळे ब्लॉक केलेले नाक उघडते आणि फुफ्फुसातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. याशिवाय हा प्राणायाम केल्याने तणावही दूर होतो.

Yoga for Cold & Cough
Yoga For Acidity : अ‍ॅसिडिटी आणि गॅसच्या समस्येने त्रासले आहात? ही योगासने देतील त्वरीत आराम

मत्स्यासन

या आसनाचा सराव केल्याने सर्दी-खोकल्यापासूनही बऱ्याच अंशी आराम मिळतो. केवळ थंडीच नाही तर श्वसनाच्या सर्व प्रकारच्या आजारांवर हे आसन फायदेशीर आहे. जर तुमच्या खांद्यावर आणि मानेमध्ये तणाव (Stress) असेल तर यामुळे देखील आराम मिळतो.

कपालभाती प्राणायाम

सर्दी दूर करण्यासाठी कपालभाती अतिशय गुणकारी आहे. या प्राणायामामध्ये नाकावर दाब निर्माण करताना श्वास जबरदस्तीने सोडावा लागतो. त्यामुळे सर्दीमुळे नाकातील रक्तसंचय दूर होऊन तुम्हाला सहज श्वास घेता येतो.

Yoga for Cold & Cough
Yoga For Children | अभ्यासात लक्ष लागत नाहीये? ही 5 योगासने ठरतील मुलांसाठी फायदेशीर

यासोबतच या प्राणायामामुळे रक्ताभिसरण वाढते आणि पोटावरील चरबी कमी होते. सर्दी झाल्यास हा प्राणायाम 2 ते 3 वेळा करावा. तुम्हाला लवकरच आराम मिळेल आणि शरीर उत्साही राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com