मागच्या काही काळापासून हृदयविकाराचे प्रमाण खूप वाढले आहे. लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत प्रत्येक जण या आजाराला बळी पडताना दिसून येत आहे. बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी आणि अतिरिक्त कामाचा ताण, वेळेवर न झोपणे यामुळे हार्ट अटॅकचे प्रमाण तरुणांमध्ये वाढताना दिसून येत आहे.
हृदयाचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींसह योगासने करणे फार महत्त्वाचे आहे. योगासने शरीराची ताकद आणि लवचिकता वाढवण्यास मदत करतात. हृदयाच्या आरोग्यासाठी हे अतिशय फायदेशीर मानले जाते. जाणून घेऊया कोणती योगासने बेस्ट ठरतील.
ताडासन हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. अमेरिकन अॅकॅडमी फॉर योग इन मेडिसिनचे अध्यक्ष आणि कार्डिओलॉजिस्ट डॉ. इंद्रनील बसू रे यांच्या मते, ताडासन हे उभे राहून केले जाते. त्यामुळे शारीरिक स्थिती सुधारण्यास मदत होते. यामुळे मांड्या, घोटे आणि गुडघे मजबूत होतात. रक्त प्रवाह सुधारतो. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य (Heart Health) निरोगी राहाते.
हा योगा (Yoga) माशाच्या आकारासारखा आहे. जो हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. मणक्याच्या आधाराने केले जाणारे आसान हृदय, यकृत, मूत्रपिंड आणि पचनसंस्था मजबूत करते. तसेच मणक्याला लवचिकता आणते.
हे योगासन केल्याने हृदयविकाराचा (Heart Attack) धोका कमी होतो. या आसनात पाठ थोडीशी वाकलेली असते आणि याचा फायदा छाती आणि फुफ्फुसांना होतो. यामुळे ऑक्सिजनचा प्रवाह आणि श्वासोच्छवास सुधारतो
या योगाची मृदा वृक्षासारखी आहे. नियमित हा योगा केल्याने शरीर संतुलित राहाते तसेच मन देखील स्थिर राहाते. हृदयाला पुरेशा प्रमाणात रक्तसाठा पुरवण्यासाठी शरीर मदत करते.
अधोमुखासन केल्याने शरीर ऊर्जेने भरलेले राहाते. मेंदूचा रक्तपुरवठा वाढतो, ज्यामुळे तणाव कमी होतो. उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी हे आसन खूप प्रभावी मानले जाऊ शकते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.