World Poetry Day : जागतिक काव्य दिन ! कविता म्हणजे... जाणून घ्या 'या' दिनीनिमित्त दिग्गजांच्या कविता

World Poetry Day Theme : कधी कधी कविता लिहिताना ती सुचते देखील किंवा ती मनाला अधिक भावते देखील...
World Poetry Day
World Poetry DaySaam tv
Published On

World Poetry Day Significance : आपल्यापैकी अनेकांना नेहमी प्रश्न पडतो कविता म्हणजे काय ? ती कशी लिहावी किंवा ती कशी सुचते. कवितेमागे अनेक भाव, रहस्य व भावना दडलेल्या असतात. कधी कधी कविता लिहिताना ती सुचते देखील किंवा ती मनाला अधिक भावते देखील...

याबाबत असणारा गोंधळ किंवा प्रश्न (Questions) नेहमीच ऐकत आलो आहे, खरे तर कविता म्हणजे आपल्याला कमी शब्दात व्यक्त होण्याचं, लोकांपर्यंत भावना पोहचवण्याचं एक भावनाशील माध्यम आहे. कारण प्रत्येकजण व्यक्त होत असतो. फक्त प्रत्येकाचे माध्यम वेगवेगळे असतात. जसे एखादा चित्रकलेच्या माध्यमातून तर कोणी लेख, कथा (Story), किंवा मनसोक्त बोलून व्यक्त होतो. तसचं कविता ही सुद्धा एक अनेक मनांना जोडणारी एक खळखळणारी नदी म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही...

World Poetry Day
Right Age to Get Married: लग्न करण्याचे योग्य वय कोणते?

खर तर कविता करताना साधारण प्रत्येकजण सुरूवातीला आपल्याला जसे होईल तसे मुक्तपणे व्यक्त होत असतो त्यासाठी विशिष्ट अशी साचेबद्दपणा नसतो. म्हणजेच ती मुक्तछंदात मोडते. परत मग त्यात चारोळी,यमक,ओवी,आठोळी असे कित्येक कवितेचे प्रकार पडतात मग आपण आवडीने तो शिकू शकतो.

"कविता म्हणजे काय', असा प्रश्न वाचकांना पडतोच. मग तो या प्रश्नाचे उत्तर कुठे शोधत असेल? का नसेलच शोधत? हे प्रश्न केवळ मराठी कवितेच्या वाचकांना पडणारे प्रश्न नव्हेत; हे जगभरातील सर्व काव्यरसिकांना पडणारे प्रश्न आहेत. कवितेची समीक्षा लिहिणाऱ्या समीक्षकांनाही "कविता म्हणजे काय', हा प्रश्न ऍरिस्टॉटलच्या काळापासून आजवर छळतोच आहे.

World Poetry Day
Chulivarche Jevan : चुलीवर शिजवलेले अन्न चवदार का लागते?

रवी किरण मंडळातील प्रख्यात कवी माधव ज्यूलीयन यांनी कवीतेची अतिशय सुंदर व्याख्या आणि अतिशय कमी शब्दात केली आहे, जी जगात कुठेही पाहण्यास मिलणार नाही

" अनुभूति, कल्पना क्षणिक तरल वायवी

गुंगवून तिजला नादी, अडकवून ठेवी कवी

कविता म्हणजे कल्पना, अनुभव जी स्फुरण झाल्यावर माफक शब्दात कवी अडकवून ठेवतो. काव्य, कविता म्हणजे एका बुद्धीमान माणसाने आपणास दिसलेले अनुभवलेले तरल वायवी क्षण माफक व समर्पक शब्दात कौशल्या ने आकर्षक पद्धतीने केलेले सादरीकरण होय.

कविता म्हटले की आपल्या डोळ्यासमोर तिच्या लक्षणांची एक यादी येते. अलंकार, प्रतिमा, प्रतीक, मिथक, आदिबंध आदींचा वापर करणारी छंदोबद्ध, वृत्तबद्ध किंवा मुक्तछंद-मुक्तशैलीत लिहिली गेलेली संहिता आपण कविता म्हणून स्वीकारत असतो.

World Poetry Day
Marriage Tips : तुम्ही देखील अरेंज मॅरेज करताय ? तर 'या' 5 गोष्टीकडे नेहमी लक्ष द्या !

युनेस्कोने जागतिक (World) काव्य दिनाची सुरुवात 21 मार्च 1999 रोजी पॅरीस परिषदेत या दिवसाची घोषणा केली. तेव्हापासून प्रत्येक कवींसाठी हा दिवस खास मानला जातो. एकोणिसाव्या शतकातील फ्रेन्च कलावंत जोसेफ राँऊ ह्यांनी म्हटले होते की Science is For them Who learn, Poetry is For those who know.

या दिनाचे औचित्य साधून जाणून घेऊया काही दिग्गजांच्या कविता...

1. नदी सागरा मिळता

पुन्हा येईना बाहेर,

अशी शाहण्यांची म्हण

नाही नदीला माहेर.

- ग.दि.माडगूळकर

2. तिचे अबोल नकार अध्याहृत,

म्हणून रुजलेली ही अतींद्रिय फुले

आजूबाजूस,

तिची पाऊलवाट चुकवून

- द. भा. धामणस्कर

3. स्वप्नावर आली ओल

उन्हाची भूल

कोसळे रावां

चिमटीत पिळावा जीव

तशी घे धाव

हवेतिल वणवा

- कवी ग्रेस

4. ऊन हिवाळयांतील शिरशिरतां

स्थितप्रज्ञ काळया दगडावर,

मला वाटते क्षणभर फुटतो

दगडाला इच्छेचा अंकुर.

- विंदा करंदीकर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com