Workout tips : वर्कआउट करताना कॉफी पिणे फायदेशीर आहे का ? पिण्याची योग्य वेळ कोणती?

अनेकजण सकाळी चहाऐवजी कॉफी पिणे पसंत करतात.
Workout tips
Workout tipsSaam Tv
Published On

Workout tips : चहा किंवा कॉफीच्या सेवनाशिवाय अधिकतर लोकांची सकाळ होत नाही. आपल्यापैकी बरेच लोक हे सकाळी उठल्याबरोबर त्याचे सेवन करतात. अनेकजण सकाळी चहाऐवजी कॉफी पिणे पसंत करतात. त्याचबरोबर अनेकांच्या दिवसाची सुरुवात कॉफीने होते.

बरेच लोक कॉफीला आपल्याला रोजच्या जीवनशैलीत अधिक प्रमाणात जोडतात. आपली आवडती कॉफी (Coffee) प्रत्येकाला प्यायला आवडते. याशिवाय काही लोकांना ऑफिसमध्ये काम करताना कॉफी प्यायला आवडते, त्यामुळे त्यांचा मूड फ्रेश होतो आणि ते तणावमुक्त राहतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, जर आपण कॉफीचे योग्य प्रमाणात सेवन केले तर त्याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. वर्कआउट करण्यापूर्वी कॉफी प्यायल्यास त्याचे अनेक फायदे होतात. त्याचे फायदे कसे होतात हे जाणून घेऊया.

Workout tips
Benefits Of Salt : काळे की, पांढरे मीठ ! कोणते आहे फायदेशीर? जाणून घ्या

- प्रत्येकाला माहित आहे की, कॉफीमध्ये कॅफिन आढळते. कॅफिन हा असाच एक घटक आहे, जो आपल्या शरीराची ऊर्जा वाढवतो. कॉफीमध्ये असलेले कॅफिन आपल्या शरीराची ताकद वाढवते तसेच स्टॅमिना वाढवते. कॉफीचा आपल्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी क्षमतेवरही परिणाम होतो.

- कॉफी आपल्या शरीराची ऊर्जा तर वाढवतेच पण ती आपल्याला सक्रिय ठेवण्यासही मदत करते. आम्ही तुम्हाला सांगतो की, कॉफीच्या सेवनाने आपल्या मेंदूचे कार्यही व्यवस्थित राहते. याशिवाय, योग्य प्रमाणात कॉफीचे सेवन केल्याने वर्कआउट करताना तुमचे लक्ष केंद्रित राहते. त्यात असलेले कॅफिन हे नैसर्गिक उत्तेजक आहे, जे आपल्याला सक्रिय ठेवते.

Workout tips
Bullet Coffee : तुम्ही कधी तूप कॉफी प्यायली आहे का ? बॉलीवूडच्या अनेक नटी आहेत या कॉफीचे फॅन, नक्की ट्राय करुन पहा

- वर्कआउट (Workout) करण्यापूर्वी कॉफी प्यायल्यास स्नायूंचा त्रास कमी होण्यास मदत होते, असे म्हटले जाते. तसेच रेड वाईन, डार्क चॉकलेट, चहा आणि कॉफीमध्ये पॉलीफेनॉल असतात, ज्यामुळे जळजळ तसेच स्नायू दुखणे कमी होते.

- वर्कआउट करण्यापूर्वी लगेच कॉफीचे सेवन करू नये. तुम्ही वर्कआउटच्या अर्धा तास आधी कॉफी प्या. आपण १८० ग्रॅमपेक्षा जास्त कॉफी पिऊ नये. जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त कॉफी प्यायली तर तुम्हाला पोटाचा त्रास होऊ शकतो किंवा झोपेचा त्रास होऊ शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com