

एका नवीन अभ्यासानुसार, ज्या महिला जास्त शारीरिक संबंध ठेवतात, त्यांचा मेंदू इतर महिलांच्या तुलनेत अधिक विकसित होतो. स्त्रियांच्या लैंगिकतेबद्दलच्या भावना देखील पुरुषांप्रमाणेच असतात. परंतु त्या पुरुषांसमोर व्यक्त करु शकत नाही. संशोधकांनी स्त्रियांमधील जनन इंद्रियांच्या स्पर्शाशी संबंधित मेंदूचा भाग तपासला असता त्यात असे आढळले आहे की ज्या महिला अधिक लैंगिक संबंध ठेवतात त्यांचा मेंदू अधिक चांगला विकसित होतो. जर्नल ऑफ न्यूरोसायन्समध्ये सोमवारी प्रकाशित झालेल्या अभ्यासात 20 प्रौढ महिलांमध्ये स्पर्श आणि मेंदूच्या विकासातील दुवा तपासण्यात आला. संशोधनाचा एक भाग म्हणून, 18 ते 45 वयोगटातील महिला स्वयंसेवकांच्या क्लिटोरिसला उत्तेजित करण्यात आले आणि फंक्शनल मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग वापरून त्यांचा मेंदू स्कॅन करण्यात आला.
उत्तेजनासाठी, क्लिटॉरिसच्या जागेवर एक वस्तू ठेवली आणि ते यंत्र 10 सेकंदांसाठी आठ वेळा कंपित केले. संशोधकांनी 20 स्वयंसेवकांचे मेंदू स्कॅन केले ज्यांनी त्यांच्या क्लिटॉरिसला उत्तेजीत केले होते. या अभ्यासाचे सह-लेखक डॉ. क्रिस्टीन हेम, बर्लिनमधील चॅरिटे युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधील वैद्यकीय मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणाले की आम्हाला जनन इंद्रियामधील संभोगाची वारंवारता आणि वैयक्तिकरित्या मॅप केलेल्या जनन इंद्रियाच्या क्षेत्राची जाडी यांच्यातील संबंध आढळला.
त्यानंतर संशोधकांनी त्या मेंदूच्या क्षेत्राची जाडी मोजली आणि असे आढळले की ज्या महिला स्वयंसेविकांनी सर्वाधिक लैंगिक संबंध असल्याचे सांगितले त्यांच्यामध्ये तो अधिक विकसीत दिसला. संशोधनात देखील अनेक नवनवीन गोष्टी समोर आल्या आहेत. तथापि, संशोधन हे पुष्टी करू शकले नाही की अधिक विकसित सोमाटोसेन्सरी कॉर्टेक्स अधिक कामोत्तेजना प्रवृत्त करते की अधिक संभोगामुळे मेंदूच्या क्षेत्राचा विस्तार होतो.
विशेष म्हणजे, सेक्स मेंदूसाठी चांगला असल्याचा निष्कर्ष संशोधनातून निघण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2016 मध्ये, कॅनडातील मॅकगिल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांना असे आढळून आले की दररोज संभोग ठेवणाऱ्या स्त्रियांचा मेंदू हा कमी संभोग करणाऱ्या स्त्रियांच्या मेंदूपेक्षा जास्त गोष्टी लक्षात ठेवतो. त्याच वर्षी कॉव्हेंट्री युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात असे आढळून आले की जे वृद्ध लोक नियमितपणे सेक्स करतात त्यांच्या मेंदूचे आरोग्य चांगले होते आणि त्यांची स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता कमी असते. याव्यतिरिक्त, ते हृदयविकाराचा झटका आणि रक्तदाब देखील कमी करू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.