काका पुतण्याने मिळून केली युवकाची हत्या; रागात बघीतल्यानं केला खून

आरोपी भूषण सोमकुवर यांनी मृतक यांचावर चाकूने वार केला, यानंतर आरोपी पसार झाले.
काका पुतण्याने मिळून केली युवकाची हत्या; रागात बघीतल्यानं केला खून
काका पुतण्याने मिळून केली युवकाची हत्या; रागात बघीतल्यानं केला खूनSaam Tv
Published On: 

नागपूर : नागपूरच्या सदर पोलीस स्टेशन (Nagpur Police Station) अंतर्गत काल रात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास शुल्लक कारणावरून वादावादी झाली आणि त्यानंतर त्याचे रूपांतर हत्येत झाले आहे. या भांडणांमध्ये अनिकेत तांबे याचा मृत्यू झालेला आहे. काल रात्री अकरा वाजताच्या सुमारास मृतक आपल्या चुलत भावासह आणि एका मित्रासोबत कोल्ड्रिंक पिण्यासाठी गड्डीगोदम येथे गेला असता तिथे दूरवर बसलेल्या आरोपी आपल्याकडे नजर रोखून बघत आहे.

या कारणावरून आरोपी आणि मृतक यांच्यामध्ये वादावादी झाली आणि त्यानंतर ते घरी परत गेले परत बाराच्या सुमारास त्या ठिकाणी गेले असता आरोपी आणि मृतक यांच्यात भांडण झाले आरोपी भूषण सोमकुवर यांनी मृतक यांचावर चाकूने वार केला, यानंतर आरोपी पसार झाले. मृतक याला हॉस्पिटलमध्ये नेले असता त्याचा मृत्यू झाला आहे तर आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com