Kidney Detox: आहारात या 4 पदार्थांचा करा समावेश, किडनी निकामी होण्याचं झंझट मिटेल; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Prevent Kidney Failure: योग्य आहार घेतल्यास किडनीचे आरोग्य सुधारू शकते. दुधी, लसूण आणि सफरचंद यांसारखे पदार्थ किडनीवरील ताण कमी करण्यास मदत करतात, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.
Kidney Health
Kidney Failure Preventiongoogle
Published On

सध्या फिटनेसला खूप महत्व दिलं जातं. तरुणांपासून वृद्धापर्यंत लोक फिट राहण्यासाठी प्रयत्न करतात. त्यासाठी आवश्यक असतो म्हणजे तुमचा योग्य आहार. काही लोक यामध्ये डाएट करण्याचा विचार करतात. पण ते काटेकोरपणे फॉलो करणं जमत नाही आणि पुन्हा लोक हवे ते पदार्थ खायला सुरुवात करतात. याचा परिणाम तुमच्या थेट तुमच्या किडनीवर होतो. तुम्ही जितकं हेल्दी खाता तितकीच तुमची किडनी योग्य कार्य करते. जर यात काही अडथळे आले तर तुम्हाला भविष्यात गंभीर समस्यांना सामोरं जावं लागेल.

किडनी हा आपल्या शरीरातला सगळ्यात महत्त्वाचा अवयव असतो. तो शरीरातलं रक्त शुद्ध करतो, पाण्याचं संतुलन राखतो आणि विषारी घटक बाहेर टाकण्याचं काम करतो. मात्र किडनी योग्य प्रकारे कार्य करत नसेल, तर शरीरात टॉक्सिन्स साचतात आणि त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार जगभरात सुमारे 674 कोटी लोक क्रॉनिक किडनी आजाराशी झुंज देत आहेत. पुढे आपण काही सोपे उपाय किंवा योग्य सवयी जाणून घेणार आहोत.

Kidney Health
High Cholesterol: शरीराच्या 'या' भागात दिसतात कोलेस्टेरॉल वाढल्याची गंभीर लक्षणं, वेळीच व्हा सावध, डॉक्टरांनी दिला सल्ला

दूधी खाण्याचे फायदे

दुधी ही न आवडणारी भाजी असली तरी किडनीसाठी ती खूप महत्वाची असते. यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असतं. पोटॅशियम सुद्धा योग्य प्रमाणात असतं. याने किडनी शरीरातली घाण बाहेर टाकायला मदत करते. फ्रेश दूधीचा रस किंवा हलकी शिजवलेली दुधी शरीराला चांगलं हायड्रेशन देते आणि जास्त साखर किंवा मीठ न शोषता शरीर रिलॅक्स ठेवते.

लसणाचा परिणाम

लसूण थेट किडनीवर काम करत नसली तरी फायद्याची आहे. कारण लसणाच्या सेवनाने शरीरातले इंफ्लेमेशन कमी होतं आणि रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. कमी मीठ असलेल्या आहारात लसूण चव वाढवते. त्यामुळे किडनीवरचा ताण कमी होतो. कच्ची किंवा हलकी परतलेली लसूण जास्त फायदेशीर ठरू शकते.

सफरचंदाचा किडनीवर होणारा परिणाम

सफरचंद हे फक्त पचनासाठीच नाही तर किडनीसाठीही फायदेशीर फळ आहे. सफरचंदमध्ये भरपूर फायबर असतात, जे आतड्यांमध्ये साचलेली घाण बाहेर टाकण्याचं काम करतात. त्यामुळे किडनीवरचा भार कमी होतो. इतकच नाही तर सफरचंद ब्लड शुगर नियंत्रणात ठेवतं आणि किडनीतील लहान रक्तवाहिन्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतं. सालासकट सफरचंद खाल्ल्यास त्याचा जास्त फायदा होतो. एकूणच तुम्ही हेल्दी आहार घेणं गरजेचं आहे.

टीप

ही माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्टवर आधारित असून, ती केवळ सामान्य माहितीसाठी आहे. कोणताही आहारातील बदल करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

Kidney Health
Mangalsutra Designs: कॉटन साडीवर कोणत्या स्टाइलचं मंगळसूत्र घालावं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com