Winter Yoga Tips : हिवाळ्यात तंदुरुस्त आणि अ‍ॅक्टिव्ह राहायचे आहे? या योगासनांचा समावेश तुमच्या दिनचर्येत करा

Yoga Tips For Winter : हिवाळ्यात माणूस मुळातच खूप आळशी होतो. तसेच दररोज अंथरुणातून उठायलाही खूप आळसपणा येतो, ज्यामुळे केवळ दैनंदिन कामावरच परिणाम होतोच तसाच शरीरावरही परिणाम होतो.
Winter Yoga Tips
Winter Yoga TipsSaam Tv
Published On

Yoga Tips :

हिवाळ्यात माणूस मुळातच खूप आळशी होतो. तसेच दररोज अंथरुणातून उठायलाही खूप आळसपणा येतो, ज्यामुळे केवळ दैनंदिन कामावरच परिणाम होतोच तसाच शरीरावरही परिणाम होतो. मग हिवाळ्यात (Winter) भूकही जास्त लागते, त्यामुळे खाद्यपदार्थात बरीच विविधता असते आणि दिवसभर काही ना काही खाल्ल जात.

अशा स्थितीत काय होते तर व्यायाम न केल्यामुळे लठ्ठपणा वाढू लागतो आणि त्यासोबत कोलेस्ट्रॉलही वाढते. त्यामुळे या ऋतूत स्वत:ला अ‍ॅक्टिव्ह आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी हेवी वर्कआउट (Workout) करण्याऐवजी योगावर लक्ष केंद्रित करा. जे तुम्ही फक्त 15-20 मिनिटांत घरी सहज करू शकता. तर कोणत्या योगासनांचा दिनक्रमात समावेश करा, जाणून घ्या.

सूर्यनमस्कारा

सूर्यनमस्कार हा एकूण 12 आसनांचा बनलेला संपूर्ण व्यायाम आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे शरीर तंदुरुस्त, अ‍ॅक्टिव्ह आणि उत्साही ठेवू शकता. सूर्यनमस्कारामुळे लठ्ठपणा कमी करण्यापासून शरीराची लवचिकता वाढवणे, वेदना कमी करणे आणि शरीराचा जडपणा कमी होण्यापर्यंत अनेक समस्यांपासून आराम मिळतो. म्हणून हे 3 ते 5 वेळा सकाळी रिकाम्या पोटी करा. सूर्यनमस्कार शरीरासोबत चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठीही प्रभावी आहे.

Winter Yoga Tips
Yoga Tips : योग केल्यानंतर या गोष्टी चुकूनही करू नका, यामुळे शारीरिक समस्या उद्भवतात

वृक्षासन आणि ताडासन

हे आसन देखील असे आहे की तुम्ही ते कोणत्याही तज्ज्ञाशिवाय घरीच करू शकतो. ही आसने तुम्हाला सोपी वाटत असली तरी त्यांचे अनेक फायदे आहेत. केवळ शारीरिकच नाही तर ही आसने तुम्हाला मानसिकदृष्ट्याही तंदुरुस्त आणि अॅक्टिव्ह ठेवतात. हिवाळ्यात अनेकांना खूप नैराश्य येते, त्यामुळे त्यांनी या आसनांचा अवश्य सराव करावा.

प्राणायाम

हा योगाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. प्राणायाम हे केवळ मन शांत करत नाहीत तर अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांपासून देखील आराम देतात. उदाहरणार्थ, कपालभाती पोटाची चरबी कमी करते तर भ्रामरी मायग्रेन आणि घशातील वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे अनुलोम-विलोमच्या सरावाने फुफ्फुसांची कार्य क्षमता सुधारते. त्यामुळे योगानंतर पाच मिनिटे का होईना, प्राणायाम करा. यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल.

Winter Yoga Tips
Yoga For Fitness : दररोज नियमित फक्त 15 मिनिटे वेळ काढा, ही योगासने करा आणि निरोगी राहा

अन्य योगासने

याशिवाय त्रिकोनासन, शलभासन, बालासन यांचाही योगासनांमध्ये समावेश आहे ज्यामुळे शरीर अ‍ॅक्टिव्ह आणि ऊर्जावान बनते. याशिवाय, यामुळे हृदय निरोगी राहते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. योगाद्वारे शरीरातील रक्ताभिसरणही सुधारता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com