
आपल्यापैकी बहुतेकांना माहित आहे की वर्कआउट केल्याने शरीर निरोगी राहते आणि लठ्ठपणा कमी करण्याचा एक चांगला मार्ग देखील आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का की व्यायाम करण्याची योग्य वेळ कोणती? या प्रश्नाचे उत्तर द ओबेसिटी सोसायटी (TOS) जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात सापडले आहे. चला तर पाहूयात वर्कआउटची नेमकी वेळ कोणती
द ओबेसिटी सोसायटीमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार सकाळी 7 ते 9 या वेळेत वर्कआउट (Workout) केले तर वजन कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी ठरते. फ्रँकलिन पियर्स युनिव्हर्सिटीच्या आरोग्य विज्ञान विभागातील सहाय्यक प्राध्यापक आणि या अभ्यासाचे सह-लेखक डॉ. टोंग्यू मा म्हणतात की त्यांच्या संशोधनाने शरीराच्या वर्कआउट रूटीनसाठी एक नवीन पद्धत शोधली आहे ज्यामुळे आरोग्यावर होणारे परिणाम तपासले जाऊ शकतात.
वेगवेगळ्या वेळेला लठ्ठपणा कमी करण्यासाठी बॉडी वर्कआउट केल्याने तसेच मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास शरिरावर काहीही परिणाम होत नाही असे संशोधनात दिसून आले.
सकाळचा व्यायाम आणि कमी लठ्ठपणा यांचा संबंध
संशोधकांनी 2003 ते 2006 दरम्यान यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनद्वारे आयोजित केलेल्या नॅशनल हेल्थ एंड न्यूट्रिशन एक्जामिनेशनमध्ये 5285 सहभागींच्या डेटाचे सर्व्हे केला. वर्कआउट्स सकाळ, दुपार आणि संध्याकाळच्या गटांमध्ये विभागले गेले. परिणामांमध्ये असे दिसून आले की सकाळचा व्यायाम आणि लठ्ठपणाचे कमी दर यांच्यात मजबूत संबंध आहे.
यासाठी, संशोधकांनी दुपारच्या आणि संध्याकाळच्या अॅक्टिव्हिटीजची तुलना केली आणि असे आढळले की जे लोक (People) सकाळच्या व्यायामांना फॉलो करतात त्यांचा बॉडी मास इंडेक्स कमी होता आणि कंबरेचा आकार कमी झाला आहे.
महिला सकाळचा व्यायाम करतात
संशोधनात असे आढळून आले की सकाळच्या व्यायामात महिला (Women) सहभागींची संख्या अधिक होती, यासोबतच सकाळच्या सहभागींमध्ये प्रौढ आणि वृद्ध, सुशिक्षित लोक, तसेच तंबाखू आणि दारूपासून दूर राहिलेल्या लोकांचा समावेश जास्त आहे.
सकाळचा व्यायाम नियमित ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. सकाळी उठल्याबरोबर तुमच्या वर्कआउटची वेळ निश्चित करा जेणेकरून फोन, ईमेल, ऑफिस मीटिंग यासारख्या गोष्टींमुळे तुमचे लक्ष विचलित होणार नाही. त्यापूर्वी व्यायाम पूर्ण केला करा आणि स्वस्थ राहा.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.