Winter Special Recipe: थंडीत घरच्या घरी बनवा पौष्टिक अन् चविष्ट बाजरीचे वडे; रेसिपी पाहा

Bajri Wada Recipe: थंडीत शरीराला उर्जेचे खूप जास्त गरज असते. त्यामुळे थंडीत पौष्टिक अन्न खाणे आवश्यक असतात. या काळात बाजरी खाणे खूप फायदेशीर असते. त्यामुळे घरी बाजरीचे अनेक पदार्थ ट्राय करा.
Bajri Wada
Bajri Wada Saam Tv
Published On

Bajri Wada Recipe Tips:  

थंडी सुरु झाली आहे. थंडीच्या दिवसात शरीराला खूप जास्त ऊर्जेची गरज असते. थंडीत उष्ण वातावरणाची आवश्यकता असते. थंडीत अनेक आजारपण जडतात. त्यात सर्दी- खोकला, सांधे दुखणे यासारख्या समस्या खूप जास्त होतात. या काळात शरीराला उष्ण ठेवण्यासाठी आहारात बदल करायचे असतात. आहारात उष्ण पदार्थांचा समावेश करायचा असतो.

हिवाळ्यात आहारात तीळ, गूळ, बाजरी, सुकामेवा खायचा असतो. त्यामुळे शरीराला उष्णता मिळते. या काळात बाजरी खाणे खूप फायदेशीर असते. हिवाळ्यात बाजरीची भाकरी, बाजरीची खिचडी खाणे चांगले असते. परंतु नेहमीच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे तुम्ही बाजरीचे वडे बनवू शकता. खाण्यासाठी एकदम चविष्ट आणि शरीरासाठी पौष्टिक असलेल्या बाजरीचे वडे कसे बनवायचे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Recipe)

सामग्री

  • बाजरीचे जाडसर पीठ

  • बेसन

  • तीळ

  • तिखट

  • हळद

  • धणे-जीरे पावडर

  • मीठ

  • कोथिंबीर

  • तेल

Bajri Wada
Parenting Tips: पालकांनो, अभ्यासाचं पुस्तक हातात घेताच मुलांना झोप येते? कारणं काय?

कृती

  • सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात बाजरी आणि बेसनाचे पीठ एकत्र करावे.

  • त्यानंतर त्यात तीळ, मीठ, हळद, धणेजीरे पावडर घालून मिक्स करावे.

  • या मिश्रणात गरम पाणी घालून पीठ मळून घ्यावे. पीठ एकदम घट्ट मळावे.

  • यानंतर त्यात कोथिंबीर आणि थोड तेल टाकावे. हे मिश्रण मुरण्यासाठी झाकून ठेवावेल

  • यानंतर हातावर वडे थापून घेऊन तेलात तळून घ्यावे.

  • हे वडे तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा दहीसोबत खाऊ शकता.

Bajri Wada
Upcoming Smartphone in December 2023: डिसेंबर महिन्यात लाँच होणार ५ हटके फोन; जाणून घ्या किंमत, फीचर्स अन् बरंच काही

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com