Parenting Tips: पालकांनो, अभ्यासाचं पुस्तक हातात घेताच मुलांना झोप येते? कारणं काय?

Parentiong Tips For Child Memory: लहान मुलांना अनेकदा अभ्यास करताना झोप येते. यामागचं मुख्य कारण म्हणजे मुलांमध्ये अभ्यासाची आवड नसणे. यासाठी पालकांना विशेष काळजी घ्यायला हवी.
Parenting Tips
Parenting TipsSaam Tv
Published On

Parenting Tips For Child Study:

लहान मुलांना चांगल्या सवयी लावणे खूप महत्त्वाचे असते. लहान मुलांना आपण जसे शिकवू, ज्या सवयी लावू त्या ते आत्मसात करतात आणि तसेच वागतात. चांगल्या सवयींसोबत त्यांना वाईट सवयीदेखील लागतात. त्यामुळे घरातील मोठ्या व्यक्तीने कोणतीही गोष्ट करताना काळजी घ्यावी. लहान मुले मोठ्या व्यक्तींचे बघून अनेक गोष्टी शिकतात. अशातच त्यांना काही वाईट सवयीदेखील लागतात. त्यातील एक म्हणजे अभ्यास करताना आळस येणे आणि झोपणे.

लहान मुले अनेकदा खूप वेळ टीव्ही, मोबाईल पाहतात. परंतु तेच जर त्यांना अभ्यास करायला सांगितले तर ते कंटाळा करतात. त्यांना झोप येते. यामगे अनेक कारणे असतात. त्यातील एक म्हणजे त्यांना अभ्यासाची आवड नसते आणि दुसरं म्हणजे एका जागी खूप वेळ बसल्याने मुलांना झोप येते. खाण्यापिण्याच्या सवयी, अभ्यासाच्या वेळा, झोपेची वेळ यामुळे मुलांना झोप येते. त्यामुळे मुलांची खूप काळजी घ्यायला हवी.

झोप येऊ नये म्हणून या गोष्टी करा

मुलांना अभ्यास करताना झोप येण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना अभ्यासाची आवड नसते. त्यामुळे सर्वप्रथम पालकांनी मुलांना अभ्यासाची गोडी लावायला हवी. वेगवेगळ्या पद्धतीने मुलांकडून अभ्यास करुन घ्यायला हवा. जेणेकरुन त्यांना कंटाळा येणार नाही.

मुलांच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळेही आळस येतो. त्यामुळे त्यांच्या जेवणात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. मुलांनी रोज एक फळ खावे. त्यामुळे शरीराला आवश्यक त्त्वे मिळतात. तसेच जंक फूड, फास्ट फूड खाणे बंद करावे. त्यामुळे शरीरातील फॅट्स वाढतात आणि आळस येतो. झोपावेसे वाटते.

Parenting Tips
Gadgets Harming Our Brain : धक्कादायक! मोबाइल-गॅजेट्सचा मेंदूवर होतोय परिणाम, कारण काय? संशोधनातून सिद्ध

मुले रात्री किती वेळ झोप घेतात यावरही त्यांचा आळशीपणा अवलंबून असतो. लहान मुलांनी पुरेशी झोप घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे दिवसभर त्यांना झोप येत नाही. परिणामी त्यांच्यातील आळशीपणा कमी होतो.

दिवसभर पुरेसे पाणी आणि पौष्टिक जेवण करावे. त्यामुळे दिवसभर ऊर्जा मिळते. यामुळे आळशीपणा कमी होते.

एकजागी खूप वेळ बसून अभ्यास केल्याने झोप येते. आळस येतो. त्यामुळे अभ्यासात थोडा वेळ ब्रेक घ्यावा. इकडे तिकडे फिरत अभ्यास करावा. असे केल्याने आळशीपणा कमी होईल.

Parenting Tips
Upcoming Smartphone in December 2023: डिसेंबर महिन्यात लाँच होणार ५ हटके फोन; जाणून घ्या किंमत, फीचर्स अन् बरंच काही

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com