Chikki Recipe : थंडीच्या दिवसात हेल्दी आणि पौष्टिक पदार्थाची चव चाखायची आहे? ट्राय करा, इम्युनिटी बूस्टर चिक्की

Immunity Booster Recipe : थंडीच्या दिवसात तंदुरुस्त राहायचे असेल तर शेंगदाण्याची चिक्की फायदेशीर ठरतील. शेंगदाण्यामध्ये अधिक प्रकारचे पोषकतत्व असतात. ज्याचा आरोग्याला फायदा होतो. जर तुम्हाला हिवाळ्यात हेल्दी आणि तंदुरुस्त राहायचे असेल तर शेंगदाण्याची चिक्की ट्राय करु शकता. पाहूया रेसिपी.
Chikki Recipe
Chikki Recipe Saam Tv
Published On

How To Make Immunity Booster Chikki :

हिवाळ्यात तापमानात अनेक प्रकारचे बदल होतात. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. त्यामुळे या काळात सर्दी आणि खोकल्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. हिवाळ्यात आपल्याला आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करण्यास सांगितले जाते.

थंडीच्या (Winter Season) दिवसात तंदुरुस्त राहायचे असेल तर शेंगदाण्याची चिक्की फायदेशीर ठरतील. शेंगदाण्यामध्ये अधिक प्रकारचे पोषकतत्व असतात. ज्याचा आरोग्याला (Health) फायदा होतो. जर तुम्हाला हिवाळ्यात हेल्दी आणि तंदुरुस्त राहायचे असेल तर शेंगदाण्याची चिक्की ट्राय करु शकता. पाहूया रेसिपी (Recipes). ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. साहित्य

  • १५० ग्रॅम भाजलेले शेंगदाणे

  • वेलची पावडर

  • तूप

  • चिक्की गूळ

  • सुका मेवा

  • खसखस

  • तीळ

  • बेकिंग सोडा

Chikki Recipe
Dry Fruits Ladoo Recipe : हिवाळ्यात थंडीपासून वाचण्यासाठी ट्राय करा इम्युनिटी बूस्टर ड्राय फ्रुट्स लाडू, राहाल तंदुरुस्त

2. कृती

  • इम्युनिटी बूस्टर चिक्की बनवण्यासाठी एका पॅनमध्ये ड्रायफ्रुट्स, खसखस, तीळ आणि शेंगदाणे टाकून तळून घ्या.

  • आता एका कढईत तूप घाला आणि गूळ वितळण्यासाठी चमच्याने सतत ढवळत राहा, म्हणजे गूळ चिकटणार नाही आणि जळणार नाही.

  • गूळ वितळला की त्यात खाण्याचा सोडा टाकून चांगला फेटा.

  • गुळाचा सरबत तयार झाला की त्यात सर्व भाजलेले ड्रायफ्रुट्स, तीळ, खसखस, शेंगदाणे आणि वेलची पूड घालून मिक्स करा.

  • आता एका ट्रेमध्ये तूप लावून गुळ आणि ड्रायफ्रुट्सपासून बनवलेली चिक्की ट्रेमध्ये टाका.

  • ट्रेमध्ये चिक्की पसरवल्यानंतर लगेच चाकूच्या साहाय्याने कापून घ्या. नंतर सर्व्ह करा शेंगदाण्याची चिक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com