Winter Health: हिवाळ्यात फिट अँण्ड फाइन राहायचंय? तर आजपासून करा 'ही' कामे

Winter Health Tips: आता हिवाळा ऋतू सुरू होत असून थंडी जाणवू लागलीय. अशा परिस्थितीत प्रत्येकाने स्वत:ला तंदुरुस्त ठेवणे खूप गरजेचे आहे. हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी काय करावे हे आपण जाणून घेऊ.
Winter Health: हिवाळ्यात फिट अँण्ड फाइन राहायचंय? तर आजपासून करा 'ही' कामे
Winter Health Tips
Published On

नोव्हेंबर सुरू होताच वातावरणात बदल झाला असून हलकीशी थंडी जाणवू लागलीय. हवामान अंदाजानुसार, येत्या दिवसात थंडी वाढू शकते. या थंड वातावरणात फिट अँण्ड फाइन राहायचं असेल तर आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागेल. आयुर्वेदानुसार हिवाळ्याच्या ऋतूमध्ये नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती वाढते. थंड हवामानात शरीराचे तापमान कमी होते. नवीन हवामानाशी जुळवून घेण्यासाठी शरीर थर्मोरेग्युलेशनमधून जात असते.

कधी-कधी या बदलामुळे हिवाळ्यात आपल्याला अनेक आजारही होऊ शकतात, पण काही खबरदारी घेतल्यास त्यापासून बचाव होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया आपण हिवाळ्यात निरोगी राहण्याचे उपाय.

निरोगी आहार

कडधान्य, मांस, मासे, कोंबडी, शेंगा, सुका मेवा, बियाणे, औषधी वनस्पती, मसाले, ताजी फळे आणि भाज्या यांचा समतोल आहार घेतल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढते. व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थही आपण अधिक सेवन करू शकतो कारण त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Winter Health: हिवाळ्यात फिट अँण्ड फाइन राहायचंय? तर आजपासून करा 'ही' कामे
Diwali 2024 : दिवाळीत फराळावर ताव मारल्यावर 'ही' गोष्टी अजिबात करू नका, नाहीतर हृदयविकाराचा वाढता धोका

व्यायाम

हिवाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी शारीरिक हालचाली करणं आवश्यक आहे. योगासने, धावणे, चालणे किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग करून तुम्ही तुमचे शरीर उबदार ठेवू शकता. यामुळे आजार किंवा सर्दी-खोकला सारख्या आजारांपासून संरक्षण होते आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहील.

मॉइश्चरायझर

हिवाळ्यात त्वचेचे नुकसान हा मोठा धोका असतो. थंडीमुळे त्वचेचे नुकसान होते. त्यामुळे त्वचा कोरडी होते आणि खाज सुटते. ओठ फुटतात आणि टाच फुटतात. यामुळे हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.

Winter Health: हिवाळ्यात फिट अँण्ड फाइन राहायचंय? तर आजपासून करा 'ही' कामे
Weight Loss Tips : २ ग्लास पाणी पिताच कमी होईल तुमचं वजन; फक्त सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

पाणी

दररोज आवश्यक प्रमाणात पाणी प्या आणि हायड्रेटेड रहा. पाणी आपली पचन प्रणाली नीट ठेवण्यास मदत करते आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यासही मदत करते. तसेच पाणी शरीरातील पेशींमध्ये पोषक द्रव्ये वाहतूक करण्यास आणि शरीरातील द्रव संतुलित करण्यास मदत करत असते.

झोप

चांगली झोप शरीराची रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवण्यास मदत करते. तणाव संप्रेरक कॉर्टिसॉल काढून टाकते आणि स्नायूंच्या पुनर्प्राप्तीसाठी देखील मदत करते. चांगले आरोग्य राखण्यासाठी झोप अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे किमान 7-8 तास गाढ झोप घ्यावी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com