

हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत, आणि त्यासोबत खोकला, सर्दी तसेच फ्लू आणि न्यूमोनियासारख्या मोसमी संसर्गांनी कळस गाठला आहे. हवामान जितके अधिक थंड तितके विषाणू अधिक सहजपणे फैलावतात, म्हणजेच अधिक लोक आजारी पडतात. पण चांगली खबर म्हणजे वारंवार हात धुणे, चांगला आहार आणि शरीराची उब राखणे यांसारख्या साध्यासोप्या उपाययोजना करून तुम्ही या आजारांच्या दोन पावले पुढे राहू शकता.
आपल्याला साधा फ्लू झालाय की काहीतरी अधिक गंभीर दुखणे आहे हे ओळखणे कठीण जाऊ शकते, कारण काही समान लक्षणे दोन्ही परिस्थितींमध्ये दिसून येतात. खोकला, थकवा, घसा बसणे, अंगदुखी किंवा अगदी धाप लागण्यासारखी लक्षणे ही फ्लूसारख्या श्वसनसंस्थेच्या आजाराची असू शकतात किंवा न्यूमोनियाचीही असू शकतात. ही लक्षणे तशीच राहिली किंवा आणखी बळावली, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे सर्वोत्तम ठरते.
डॉ. अरुण वाधवा, एमबीबीएस, एमडी – पीडिअॅट्रिक डॉ. अरुण वाधवा क्लिनिक, दिल्ली हे या मोसमादरम्यान अचूक निदानाच्या महत्त्वावर भर देताना सांगतात, “हिवाळी आजारांचे प्रमाण वाढत असताना, योग्य निदान करून घेणे हाच आजारातून बरे होण्याचा व गुंतागूंती टाळण्याचा खात्रीशीर मार्ग आहे. तुम्हाला बरे वाटत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका – सुरक्षित आणि निरोगी राहण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.”
वेळच्यावेळी तपासण्या करून घेण्याची गरज
आपल्या वेगवान आयुष्यामध्ये, कुणालाही आजारामुळे बाजूला पडण्याची इच्छा नसते. इथेच वेगवान चाचण्या मदतीला येतात, ज्या फ्लू आणि न्यूमोनियासारख्या श्वसनसंस्थेच्या आजारांचे निदान करण्याचा एक झटपट व कार्यक्षम मार्ग दाखवतात.
डॉ. सोनू भटनागर, मेडिकल अफेअर्स डायरेक्टर, इन्फेक्शियस डिजिज, अबॉट वेळीच तपासण्या करण्याचे महत्त्व अधोरेखित करताना सांगतात, “श्वसनसंस्थेला होणाऱ्या संसर्गांना परिणामकारकरित्या हाताळण्याच्या कामी चाचण्या महत्त्वाची भूमिका निभावतात. श्वसनसंस्थेच्या वेगवेगळ्या आजारांसाठी रॅपिड टेस्टिंगचे पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे झटपट व अचूक निदान मिळणे शक्य होते.”
थंडीत आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपाययोजना-
1. चाचणी करून घ्या: आपण कशामुळे आजारी पडतो हे माहीत असणे हे बरे होण्याच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल ठरते. तुम्हाला श्वसनसंस्थेच्या एखाद्या संसर्गाची लक्षणे आढळून येत असतील तर आपल्या डॉक्टरांशी बोला आणि झटपट चाचणी करून घेण्याचा विचार करा. रॅपिड टेस्ट्समुळे लवकर उत्तरे मिळण्यास मदत होते. त्यामुळे डॉक्टर योग्य उपचार निवडण्यास सक्षम बनतात, जेणेकरून तुम्हाला लवकर बरे वाटावे.
2. आपल्या स्थितीवर देखरेख ठेवा: आपल्या लक्षणांवर व त्यांच्या तीव्रतेवर लक्ष ठेवा. ताप वाढत असेल किंवा कोणतीही लक्षणे बिघडत चालल्याचे दिसून येत असेल तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
3. उपचार घ्या: लवकरात लवकर निदान झाल्यास तुम्ही तत्परतेने उपचार मिळवू शकता. औषधांचा संपूर्ण कोर्स पूर्ण काटेकोरपणे पूर्ण करण्याची व लक्षणांपासून आराम मिळण्यासाठी आणि संसर्गाशी दोन हात करण्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची काळजी घ्या.
4. स्वत:ची काळजी घ्या: भरपूर आराम व झोप घ्या. सावकाशीने वागा, शरीराची आर्द्रतेची पातळी जपा (पाणी, ब्रॉथ, शहाळ्याचे पाणी किंवा ताज्या फळांचा रस घेऊन) आणि सकस आहार घ्या.
5. घरी रहा: तुम्हाला आजाराची लक्षणे जाणवत असल्यास तुम्ही स्वत:ला वेगळं करायला हवं. असं केल्याने तुम्हाला बरे होण्यासाठीचा वेळ मिळेल तसेच संसर्ग इतरांपर्यंत पोहोचणार नाही याचीही खबरदारी घेतली जाईल.
हिवाळा ऐन भरात असताना, आपण दोन पावले पुढे राहत आपल्या आरोग्याचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही बरे असाल तर हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आणि इतरांपासून अंतर राखणे अशा काही सोप्या प्रतिबंधात्मक सवयी बाळगा. फ्लू आणि न्यूमोनियासाठीच्या लस घेणे हा सुरक्षित राहण्याच्या काही सर्वोत्तम मार्गांपैकी एक मार्ग आहे. या उपाययोजना केल्याने तुम्हाला सुरक्षितपणे या ऋतूचा आनंद घेता येईल आणि तुमच्या कुटुंबातील तुमचे प्रियजनही निरोगी राहतील. उबदारपणा आणि स्वास्थ्यपूर्ण हिवाळ्यासाठी अनेक शुभेच्छा!
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.