Railway News : ट्रेनमध्ये टॉयलेट असते, पण लोकल आणि मेट्रोमध्ये का नाही? वाचा नेमकं कारण

Why Mumbai Local and Metro Trains Dont Have Toilets : मुंबई लोकल आणि मेट्रोमध्ये शौचालयाची सुविधा का नसते तुम्हाला माहित आहे का? या गाड्यांमध्ये शौचालय नसण्यामागे प्रवासाचा कमी कालावधी, डब्यातील अपुरी जागा आणि देखभाल-देखरेखीचा वाढणारा खर्च ही प्रमुख कारणे आहेत.
Railway News : ट्रेनमध्ये टॉयलेट असते, पण लोकल आणि मेट्रोमध्ये का नाही? वाचा नेमकं कारण
Mumbai Local and Metro Trains Dont Have ToiletsSaam Tv
Published On
Summary
  • लोकल व मेट्रोचे डबे हाय-कॅपॅसिटी, कमी स्पेस डिझाइनचे असतात

  • प्रवास कमी अंतराचा असल्याने टॉयलेटची गरज तुलनेने कमी

  • सुविधा जोडल्यास देखभाल खर्च वाढून तिकिट दरवाढीचा धोका निर्माण होऊ शकतो

  • प्रवाशांसाठी स्थानकांवर स्वच्छतागृह हा व्यवहार्य पर्याय

नोकरदार वर्ग आणि लोकल ट्रेनचं अनोखं नातं आहे. लोकल ट्रेनमुळे आजपर्यंत प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि जलद झाला आहे. मुंबई लोकलला म्हणूनच जीवन वाहिनी संबोधतात. मात्र या लोकलमध्ये किंवा मेट्रो मध्ये प्रवाशांसाठी शौचालये का नाहीत असा प्रश्न तुम्हालाही पडत असेलच ना? लांब पल्ल्यांच्या रेल्वे मध्ये शौचालये सरकारने उपलब्ध करून दिली आहेत, मात्र लोकल मध्ये का नाही? तुमच्या या शंकेचं निरसन करायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी.

लांब पल्ल्यांच्या गाड्या म्हणजेच गावच्या दिशेने जाणाऱ्या सर्व रेल्वेमध्ये शौचालये असतात मात्र मेट्रोमध्ये किंवा लोकल ट्रेन मध्ये त्याची सुविधा नाही. लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा प्रवास दीर्घ कालावधीसाठी असतो. त्यामुळे प्रवाशांना चालू प्रवासात शौचालयाची गरज भासू शकते. यासाठी शौचालये उपलब्ध करून दिली जातात.

Railway News : ट्रेनमध्ये टॉयलेट असते, पण लोकल आणि मेट्रोमध्ये का नाही? वाचा नेमकं कारण
Today Winter Temprature : राज्यात थंडीचा पारा घसरला! कमाल तापमानात वाढ; कसे असेल आजचे हवामान? जाणून घ्या

मेट्रोचा प्रवास लहान असतो, त्यामुळे प्रवासी त्यांचा प्रवास पूर्ण केल्यानंतरही शौचालय वापरू शकतात. जर मेट्रो स्थानकांवर शौचालये असतील तर प्रवासी त्यांचा वापर करू शकतात आणि दुसरी मेट्रो पकडू शकतात, परंतु लांब पल्ल्यांच्या ट्रेनच्या बाबतीत असे नाही. एकदा ट्रेन चुकली की, प्रवासी दुसरी ट्रेन चढू शकत नाहीत, म्हणूनच ट्रेनमध्ये शौचालये उपलब्ध करून दिली जातात.

Railway News : ट्रेनमध्ये टॉयलेट असते, पण लोकल आणि मेट्रोमध्ये का नाही? वाचा नेमकं कारण
Today Winter Temprature : राज्यात तापमानात चढ-उतार! 'या' जिल्ह्यांत पारा १० अंशाच्या खाली; वाचा आजचे हवामान कसे असेल?

याशिवाय मेट्रो आणि लोकलमध्ये तेवढी जागा देखील उपलब्ध नाही. कमी डबे आणि जास्त प्रवासी असल्याने, शौचालयांसाठी जागाच उरत नाही. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खर्च. आता, जर मेट्रोच्या किंवा लोकलच्या आत शौचालये बांधली गेली तर त्यांचा देखभालीचा खर्च जास्त येईल, ज्यामुळे तिकिटांच्या किमती वाढतील आणि दररोज वापरणाऱ्या सामान्य लोकांच्या खिशावर परिणाम होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com