Doctors remove chopstick: गळ्यात ८ वर्ष फसलेलं १२ सेमीचं चॉपस्टिक; माहिती असूनही रूग्णाचा शस्त्रक्रियेला नकार, पाहा डॉक्टरांनी काय केलं?

डॉक्टरांनाही चकित करणारी एक अनोखी घटना समोर आली आहे. चीनमधील एका व्यक्तीच्या गळ्यात तब्बल आठ वर्षे चॉपस्टिक अडकून राहिल्याचं समोर आलं असून, ही बाब ऐकून अनेकजण थक्क झाले आहेत.
Doctors remove chopstick
Doctors remove chopstickSAAM TV
Published On

डॉक्टरांनाही चकित करणारी एक अनोखी घटना समोर आली आहे. चीनमधील एका व्यक्तीच्या गळ्यात तब्बल आठ वर्षे चॉपस्टिक अडकून राहिल्याचं समोर आलं असून, ही बाब ऐकून अनेकजण थक्क झाले आहेत.

नेमकी घटना काय?

‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या अहवालानुसार, वांग नावाच्या व्यक्तीसोबत हा विचित्र प्रकार घडला. सुमारे आठ वर्षांपूर्वी तो मद्यपान करत असताना चुकून त्याच्या तोंडातून चॉपस्टिक आत गेलं. त्या वेळी त्याला हलकासा त्रास जाणवला मात्र श्वास घेण्यास कोणतीही अडचण नव्हती.

तो डॉक्टरांकडे गेला असता डॉक्टरांनी त्याला तातडीने शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. या शस्त्रक्रियेमध्ये गळ्यावर चिर देऊन चॉपस्टिक बाहेर काढावा लागणार होता. मात्र वांगने ही शस्त्रक्रिया टाळण्याचा निर्णय घेतला.

Doctors remove chopstick
Viral trending news: एक खिडकी उघडी ठेऊन केली मोठी चूक; तीन वर्षांनी घरी परतला आणि पाहिलं तर...

वर्षानुवर्षे सहन केलेला त्रास

पुढील काही वर्षांमध्ये त्याला अधूनमधून गळ्यात अस्वस्थता जाणवत होती. तरीही त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, वांगने हा त्रास सहन करत राहून उपचारासाठी परत कधीच रुग्णालय गाठलं नाही. मात्र अलीकडे त्याला दररोज सकाळी तीव्र वेदना होऊ लागल्या आणि अन्न गिळताना त्रास वाढू लागला. त्यानंतरच त्याने अखेर हॉस्पिटल गाठलं. तो डालियान शहरातील केंद्रीय रुग्णालयात आला. त्या ठिकणी त्याची तपासणी केल्यानंतर डॉक्टरही आश्चर्यचकित झाले.

मोठी शस्त्रक्रिया टाळून उपाय

तपासणीत उघड झालं की, सुमारे १२ सेंटीमीटर लांबीचा चॉपस्टिक त्याच्या गळ्यातील सॉफ्ट पॅलेट भागात अडकलेली होती. सुदैवाने, आसपासच्या महत्त्वाच्या अवयवांना कोणतंही गंभीर नुकसान झालं नव्हतं. इतकंच नाही तर त्याच्या आवाजावरही त्याचा परिणाम झाला नव्हता.

वांगने पुन्हा एकदा गळ्याला चीर देऊन करणाऱ्या शस्त्रक्रियेला नकार दिला. त्यामुळे डॉक्टरांनी तोंडातूनच एक मिनिमली इनवेसिव्ह पद्धत वापरून चॉपस्टिक काढण्याचा निर्णय घेतला. ही प्रक्रिया यशस्वी ठरली आणि अगदी कमी रक्तस्त्रावात चॉपस्टिक सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली.

Doctors remove chopstick
Viral Video: ट्रकला अचानक लागली आग, ७० वर्षीय ड्रायव्हरने पेटता ट्रक चालवत थेट नेला फायर स्टेशनमध्ये, पाहा Video

सोशल मीडियावर चर्चेला उधाण

ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर याबाबत मोठी चर्चा रंगली. अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने लिहिलं, '१२ सेंटीमीटर लांबीची वस्तू इतकी वर्षं गळ्यात कशी राहू शकते?' तर दुसऱ्याने म्हटलं, 'ही बातमी वाचूनच अंगावर काटा येतो.' काहींनी तर हा प्रश्नही उपस्थित केला की, चॉपस्टिक त्याने गिळलंच कसं?

Doctors remove chopstick
Viral video: कलिंगडाच्या सालीवरून निघालं काळं प्लास्टिक? व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ

(डिस्क्लेमर- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा आम्ही करत नाही.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com