Indian Railways : ट्रेनच्या खिडकीला काच असूनही लोखंडी जाळी का असते? ९०% लोकांना माहीत नाही यामागचं कारण

Train Facts : रेल्वेच्या खिडकीला काचेसोबत लोखंडी जाळी का असते? प्रवाशांची सुरक्षा, बाहेरून येणाऱ्या वस्तूंचा धोका, लहान मुलांचं संरक्षण आणि सामान बाहेर पडण्यापासून बचाव यामागची महत्त्वाची कारणं जाणून घ्या.
Train window grill
Train window grilllatest news
Published On: 

रेल्वेने प्रवास करताना बऱ्याचदा आपण खिडकीजवळ बसून बाहेरचे निसर्गरम्य दृश्य पाहत असतो. यावेळी ट्रेनच्या खिडकीकडे तुमचं कधी लक्ष गेलं आहे का? अनेक रेल्वे डब्यांच्या खिडक्यांना काचेसोबत लोखंडी जाळीसुद्धा लावलेली असते. पण खिडकीला आधीच काच असताना ही लोखंडी जाळी लावण्याची गरज काय? यामागे फक्त प्रवाशांची सुरक्षा नसून आणखी काही महत्त्वाची कारणं आहेत. जाणून घेऊया.

१. बाहेरून येणाऱ्या दगडांपासून संरक्षण

रेल्वे वेगाने धावत असताना रुळांच्या जवळ असलेले दगड, खडे किंवा इतर वस्तू उडून खिडकीला धडकू शकतात. त्यावेळेस काच फुटल्यावर तिचे तुकडे प्रवाशांना लागण्याची शक्यता असते. खिडकीला असलेली मजबूत लोखंडी जाळीचा वापर सेफ्टी म्हणून होतो.

२. हात आणि डोके बाहेर काढण्यापासून रोखणे

बरेच प्रवासी बाहेरचे दृश्य पाहण्यासाठी खिडकीतून हात, डोकं किंवा मोबाईल बाहेर काढतात. पण ही सवय जीवघेणी ठरू शकते. रेल्वे मार्गावर विजेचे खांब, सिग्नल, झाडं आणि दुसऱ्या ट्रेन असतात. त्यामुळे जाळीमुळे प्रवाशांना बाहेर हात किंवा डोकं काढण्यापासून रोखण्यास मदत होते.

Train window grill
EPFO : पगारातून PF कट होतोय, पण खात्यात जमा होत नाहीये? घरबसल्या असा तपासा स्टेटस

३. सामान बाहेर पडण्याचा धोका कमी होतो

प्रवासादरम्यान अनेकजण मोबाईल, पाण्याच्या बाटल्या किंवा इतर वस्तू खिडकीजवळ ठेवतात. ट्रेनला अचानक धक्का बसल्यावर या वस्तू खाली पडू शकतात. जाळीमुळे मोठ्या वस्तू बाहेर पडण्याचा धोका कमी होतो.

४. लहान मुलांच्या सुरक्षेसाठीही महत्त्वाची

रेल्वे प्रवासात लहान मुलांना खिडकीजवळ बसायला आवडतं. अशावेळी मुलं मज्जा म्हणून खिडकीतून बाहेर वाकण्याचा किंवा हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. जाळीमुळे अशा धोकादायक कृतींना काही प्रमाणात आळा बसतो.

Train window grill
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ६९ हजार होणार? पेन्शन, HRA बाबत ५ मोठ्या मागण्या

५. एसी आणि नॉन एसी डब्यांच्या खिडक्यांमध्ये फरक का?

सर्व रेल्वे डब्यांच्या खिडक्या सारख्या नसतात. जुन्या आणि अनेक नॉन एसी डब्यांमध्ये काचेसोबत लोखंडी जाळी पाहायला मिळते. तर आधुनिक एसी डब्यांमध्ये अनेकदा बंद स्वरूपाच्या खिडक्या असतात. डब्यांची रचना, प्रवाशांची सुरक्षा आणि वापराच्या गरजांनुसार खिडक्यांची रचना वेगवेगळी असते. बंद खिडक्यांमुळे धूळ, बाहेरचा आवाज आणि गरम हवा आत येण्याचं प्रमाणही कमी होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.