

नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून दर महिन्याला Provident Fund (PF) ची रक्कम कापली जाते. पण पगारातून पीएफ कापला तर तो तुमच्या EPF खात्यात जमा झालाच असं नाही, काही कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफ कापतात. पण संबंधित रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे (EPFO) जमा करत नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंटनंतरच्या बचतीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे फक्त सॅलरी स्लिपवर अवलंबून न राहता वेळोवेळी पीएफ पासबुक तपासणं महत्त्वाचं आहे.
EPF नियमानुसार, कंपन्यांना मागील महिन्याचा PF पुढील महिन्याच्या १५ तारखेपर्यंत जमा करणं बंधनकारक आहे. यामध्ये कर्मचारी आणि कंपनी या दोघांचे योगदान समाविष्ट असते. उदाहरणार्थ, ऑक्टोबर महिन्याच्या पगारातून PF कापला असेल, तर कंपनीने तो १५ नोव्हेंबरपर्यंत EPFO कडे जमा करणं आवश्यक आहे.
तुमच्या कंपनीकडून PF नियमित जमा होतोय की नाही, हे घरबसल्या ऑनलाइन तपासता येते.
सर्वप्रथम EPFO च्या मेंबर पासबुक पोर्टलला भेट द्या.
तुमचा UAN क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
तुमच्या सध्याच्या कंपनीची Member ID निवडा.
PF पासबुक उघडून प्रत्येक महिन्याची जमा रक्कम तपासा.
कर्मचारी आणि कंपनी या दोघांचे योगदान जमा झाले आहे का, हे पाहा.
पगारातून पीएफ कापला जात असेल तर पासबुकमध्ये रक्कम दिसत नसेल, तर सर्वप्रथम कंपनीच्या HR किंवा Payroll विभागाशी संपर्क साधा. संबंधित महिन्याचा पीएफ जमा केला आहे का आणि ECR भरला आहे का, याची माहिती मागा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.