UPI MDR Charges : UPI पेमेंटवर आता एक्स्ट्रा चार्ज? ₹२,००० पेक्षा जास्त व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

UPI New Rules : आता २००० रुपयांपेक्षा जास्त पेमेंटवर MDR चार्जची चर्चा सुरू झाली आहे. निवडक व्यापाऱ्यांना यामध्ये शुल्क भरावे लागू शकते.
UPI MDR Charges
UPI MDR Charges saam tv
Published On: 

दिवाळीचा सण संपलेला आहे. आता UPI पेमेंटवरच्या नव्या चार्जची चर्चा रंगताना दिसत आहे. २००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या काही UPI पेमेंटवर मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) आकारला जाणार असल्याची माहिती समोर आलीये. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने याआधी १५ ऑक्टोबरपासून हे दर लागू करण्याची योजना आखली होती. पण दिवाळीचा सण लक्षात घेऊन हा निर्णय पुढे ढकलण्यात आला. आता हे नवे दर नेमके कधी लागू होणार आणि याचा ग्राहकांचा खिशावर परिणाम होणार का? जाणून घेऊया.

२,००० पेक्षा जास्त पेमेंटवर किती चार्ज?

NPCI ने १५ सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या FAQ नुसार, निवडक व्यापाऱ्यांकडून स्वीकारल्या जाणाऱ्या २००० रुपयांपेक्षा जास्त UPI पेमेंटवर ०.४ टक्के MDR आकारला जाईल. पण या चार्जची मर्यादा ३०० रुपये ठेवण्यात आली. म्हणजेच, व्यवहाराची रक्कम कितीही मोठी असली तरी संबंधित व्यवहारासाठी ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त MDR आकारला जाणार नाही.

UPI MDR Charges
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ६९ हजार होणार? पेन्शन, HRA बाबत ५ मोठ्या मागण्या

उदाहरणार्थ, एखाद्या ग्राहकाने दुकानदाराला १ लाख रुपये UPI च्या मदतीने दिले, तर ०.४ टक्क्यांनुसार ४०० रुपये चार्ज होतो. पण कमाल मर्यादेमुळे दुकानदाराला ३०० रुपये MDR द्यावे लागतील.

UPI MDR Charges
EPFO Pension Hike : ईपीएफओ पेन्शनर्ससाठी मोठी खूशखबर! सरकार घेणार मोठा निर्णय; लवकरच वाढणार किमान पेन्शन

काही व्यवहारांसाठी वेगळे चार्ज

रेल्वे, टेलिकॉम, विमा आणि इंधन यांसारख्या काही विशिष्ट क्षेत्रांसाठी वेगळे दर ठरवण्यात आले आहेत. या श्रेणीतले २,००० पेक्षा जास्त व्यवहारांवर प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी ५ रुपये फ्लॅट चार्ज आकारला जाईल. तर म्युच्युअल फंड, शेअर्स आणि स्टॉक ब्रोकरशी संबंधित पेमेंटवर ०.२ टक्के MDR लागू होईल. या व्यवहारांसाठीही कमाल चार्जची मर्यादा ३०० रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.