Workout Tips: हेवी वर्कआऊट केल्यानंतर हात का थरथरू लागतात? समस्या टाळण्यासाठी 'या' टीप्स करा फॉलो

Tips for Workout : वर्कआउटनंतर हात थरथरणं ही बऱ्याच लोकांना जाणवणारी एक सामान्य समस्या आहे. मात्र काही वेळाने हात स्वत:हून थरथरणं आपोआप थांबतं.
Workout Tips
Workout Tipssaam tv
Published On

फीट आणि फाईन राहणं हे प्रत्येकाला आवडतं. फीटनेस जपण्यासाठी अनेकजण एक्सरसाईज करतात. यासाठी जीममध्ये घामही गाळला जातो. अनेकदा जीममध्ये वजन उचलल्याने किंवा एक्सरसाईज केल्याने काही लोकांचे हात थरथरू लागतात. वर्कआउटनंतर हात थरथरणं ही बऱ्याच लोकांना जाणवणारी एक सामान्य समस्या आहे. मात्र काही वेळाने हात स्वत:हून थरथरणं आपोआप थांबतं.

व्यायामानंतर हात का थरथरतात?

जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपल्या शरीराला खूप मेहनत करावी लागते. जेव्हा मसल्सची क्रिया वाढते तेव्हा शरीरात लॅक्टिक ऍसिड तयार होतं. ज्यामुळे थकवा आणि क्रॅम्स येऊ शकतात. शिवाय, जेव्हा आपण हाय-इंटेंसिटी वर्कआउट करतो तेव्हा शरीरातील ऊर्जा खर्च होते आणि ग्लुकोजच्या कमतरतेचा त्रास होऊ शकतो. या कारणाने हात थरथरण्याची स्थिती उद्भवू शकते.

Workout Tips
Constipation Problem: कॉन्स्टिपेशनने हैराण, पोट साफ होत नाही? रात्री झोपण्यापूर्वी करा 'या' गोष्टी, घरगुती उपाय करतील आतडी स्वच्छ

इलेक्ट्रोलाइट्सचं असंतुलन

वर्कआउट करताना घामामुळे शरीरातून सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारख्या इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता होऊ शकते. त्यांच्या कमतरतेमुळे क्रॅम्प्स आणि थरथरण्याची तक्रार उद्बवू शकते.

थकणं

जास्त वेळ अधिक वजन उचलल्याने शरीराचे स्नायू थकतात. यावेळी स्नायूंना मेंदूकडून पुरेसे सिग्नल मिळत नाहीत. यामुळे स्नायूंच्या समस्या देखील उद्भवू शकतात.

Workout Tips
Foam in Urine: लघवीतून फेस येतोय, रंग बदलतोय; किती धोका आणि डॉक्टरांकडं नेमकं कधी जाल?

काय काळजी घ्याल?

संतुलित आहार

व्यायामापूर्वी आणि नंतर योग्य आहार घ्या. कार्बोहायड्रेट्स, प्रथिने यांचं सेवन करा जेणेकरून शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते.

Workout Tips
Lung Cancer : फुफ्फुसांच्या कॅन्सरची शरीरात दिसून येतात 'ही' लक्षणं; 99 टक्के लोकं करतात इग्नोर

हायड्रेशन

व्यायामादरम्यान आणि नंतर योग्य प्रमाणात पाणी पिणं फार महत्वाचे आहे. पाण्यासोबतच इलेक्ट्रोलाइट्स असलेलं पेय देखील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यासाठी मदत करतं.

पुरेशी झोप

शरीराच्या रिकवरीसाठी झोप खूप महत्त्वाची आहे. पुरेशी झोप न मिळाल्यास, वर्कआउट केल्यानंतर स्नायू पूर्णपणे बरे होत नाहीत.

Workout Tips
Stomach cancer : सकाळी वॉशरूममध्ये दिसून येतात पोटाच्या कॅन्सरची 'ही' लक्षणं; शरीरातील बदल ओळखून वेळीच डॉक्टरांची मदत घ्या

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com