Constipation Problem: कॉन्स्टिपेशनने हैराण, पोट साफ होत नाही? रात्री झोपण्यापूर्वी करा 'या' गोष्टी, घरगुती उपाय करतील आतडी स्वच्छ

How To Clear Stomach Naturally: पोट साफ न होण्याच्या समस्येमुळे आपल्याला शारीरिक त्रास तर होतोच मात्र याशिवाय काहींना याच्या मानसिक त्रासालाही सामोरं जावं लागतं.
How To Clear Stomach Naturally
How To Clear Stomach Naturallysaam tv
Published On

बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन एक सामन्य समस्या मानली जाते. मात्र ही समस्या अनेकांना दैनंदिन जीवनात प्रचंड त्रासदायक ठरते. पोट साफ न होण्याच्या समस्येमुळे आपल्याला शारीरिक त्रास तर होतोच मात्र याशिवाय काहींना याच्या मानसिक त्रासालाही सामोरं जावं लागतं. याचं कारण असं की, जर आपले पोट साफ नसेल तर आपल्याला फ्रेश वाटत नाही. यामुळे दिवसभर आपल्याला कोणतंही काम करावेसं वाटत नाही.

या समस्येमध्ये रूग्णांना पोट भरल्यासारखं वाटतं. ज्यामुळे आपल्याला काहीही खावेसं वाटत नाही. बद्धकोष्ठतेमुळे पोट साफ होत नाही आणि त्यामुळे हळूहळू गॅस, ॲसिडिटी आणि पचनाच्या इतर समस्या उद्भवू शकतात. तुमचं पोट अधूनमधून साफ ​​होत असेल आणि तुम्हाला या समस्येने बराच वेळ त्रास होत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही टीप्स देणार आहोत. झोपण्यापूर्वी काही सोप्या उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमचं पोट साफ होण्यास मदत होऊ शकते.

बद्धकोष्ठता होण्याची कारणं | Causes of Constipation

फायबरची कमतरता

अन्नामध्ये पुरेशा प्रमाणात फायबर नसल्यामुळे पचनक्रिया मंदावू शकते.

कमी प्रमाणात पाणी पिणं

शरीरात पाण्याची कमतरता हे बद्धकोष्ठतेचं मुख्य कारण असू शकतं.

चुकीची जीवनशैली

खाण्या-पिण्याच्या योग्य सवयी नसणं आणि झोपण्याची-उठण्याची वेळ नसणं यामुळे देखील ही समस्या वाढू शकते.

तणाव-चिंता

मानसिक आरोग्याचा तुमच्या पाचन संस्थेवर विपरीत परिणाम होत असतो.

How To Clear Stomach Naturally
Blood Sugar: जेवल्यानंतर पायी चालल्याने ब्लड शुगर लेवल कमी होते? तज्ज्ञांनी सांगितलं सत्य

बद्धकोष्ठतेची लक्षणं (Symptoms of Constipation)

  • पोट सतत जड वाटणं

  • मल त्याग करणं कठीण होणं

  • गॅस

  • पोटदुखी

  • भूक न लागणं

  • पोट साफ न होणं

झोपण्यापूर्वी या उपायांचा करा अवलंब | How To Keep Your Stomach Clean, Do These Remedies Before Sleeping

कोमट पाणी आणि लिंबू

रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध लिंबू पिळून प्या. हे प्यायल्याने तुमचं पाचन तंत्र एक्टिव्ह करतं. यामुळे तुमचं पोट साफ होण्यास मदत होते.

How To Clear Stomach Naturally
Swelling In Lungs: फुफ्फुसांना सूज आल्यावर शरीर देतं 'हे' मोठे संकेत; लक्षणं ओळखून वेळीच डॉक्टरांची घ्या मदत

त्रिफळा चूर्णाचं सेवन

त्रिफळा चूर्ण हे आयुर्वेदात बद्धकोष्ठतेवर उत्तम उपाय मानण्यात आलं आहे. यामध्ये रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घेऊन प्या. त्यामुळे पचनक्रिया सुधारते.

How To Clear Stomach Naturally
Blood in Stool: वारंवार शौचातून रक्तस्राव होतोय? काय असू शकतात कारणं, दुर्लक्ष करू नका!

अंजीर आणि मनुका

रात्री पाण्यात 2-3 अंजीर आणि 4-5 मनुके भिजवून ठेवा. त्यानंतर यांचं सेवन करा. यामुळे पोट सहज साफ होण्यास मदत करते.

गाईचं तूप आणि गरम दूध

झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध एक चमचा गाईचं तूप मिसळून प्या. हे तुमच्या आतड्यांसाठी फायदेशीर ठरतं. यामुळे त्यांची हालचाल होण्यास मदत होते.

How To Clear Stomach Naturally
Stroke Symptoms: स्ट्रोक येण्याच्या १ महिनापूर्वी शरीरात दिसतील 'हे' बदल; अनेकजण करतात लक्षणांना इग्नोर

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com