आपल्याला जडलेल्या आजारांची माहिती शरीर देत असतं. अनेकदा ही लक्षणं लघवीच्या माध्यमातून देखील दिसतात. कधीतरी लघवीमध्ये फेस येणं सामान्य असतं. प्रत्येक व्यक्तीने कधी ना कधी लघवीतून फेस येत असल्याचं पाहिलं असेल. परंतु लघवीमध्ये वारंवार फेस येत असेल तर ही परिस्थिती गंभीर असू शकते. अनेक लोक लघवीमध्ये फेस येण्याची समस्या सामान्य मानून त्याकडे दुर्लक्ष करतात.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लघवीमध्ये कमी प्रमाणात फेस येणं सामान्य आहे. जर एखादी व्यक्ती निरोगी असेल तर त्याच्या लघवीमध्ये कमी प्रमाणात फेस येऊ शकतो. परंतु, लघवीमध्ये जास्त प्रमाणात फेस येत असल्यास या स्थितीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. लघवीमध्ये जास्त फेस येणं ही अत्यंत गंभीर स्थिती आहे. लघवीत फेस येणं हे गंभीर आजारांचे लक्षण असू शकते.
जर तुम्हाला वारंवार लघवीमध्ये फेस येत असेल तर नक्कीच डॉक्टरांकडे जा.
लघवी करताना जळजळ किंवा वेदना होत असल्यास, ही स्थिती चिंताजनक असू शकते.
जर लघवीचा रंग गडद पिवळा किंवा फेसासह लाल असेल तर या स्थितीकडे दुर्लक्ष करू नका.
लघवीमध्ये फेस असल्यास तसंच शरीरात सूज येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
पाय किंवा डोळ्यांभोवती सूज येण्याकडे दुर्लक्ष करू नका.
शरीरातून जास्त प्रोटीन बाहेर पडणं
किडनीसंबंधीच्या समस्या
युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन
मूत्राशयावर अधिक दबाव पडणं
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.