Belly Fat: वयाच्या तिशीनंतरच का वाढतो पोटाचा घेर? जाणून घ्या 'चरबी' वाढण्याची ४ कारणे

Belly Fat After 30: ३० नंतर मेटाबॉलिज्म, हार्मोनल बदल आणि स्नायू कमी झाल्यामुळे पोटाची चरबी वाढते. तज्ज्ञांच्या मते योग्य आहार व जीवनशैलीने हा घेर कमी करता येतो.
Belly Fat: वयाच्या तिशीनंतरच का वाढतो पोटाचा घेर? जाणून घ्या 'चरबी' वाढण्याची ४ कारणे
Published On

बाहेरचे पदार्थ खाणे हा तरुणांमध्ये मोठा ट्रेंड झालाय. त्यात ३० वर्षाची तरुण मंडळी कामानिमित्त दिवसेंदिवस बाहेर राहतात. त्यामुळे त्यांना बाहेरचं खाणं हाच एक ऑप्शन राहतो. याने त्याच्या नकळत पोटाचा घेर वाढत जातो. याचं कारण खाण्यामध्ये फॅटी फूड्सचं वाढणारं प्रमाण आहे. डाएट नाही पण योग्य आहार तुम्हाला हेल्दी ठेवण्याचं काम करतं. मग तुम्ही तिशीत असा किंवा साठीत. बऱ्याच जणांना असं वाटतं की तिशीत असलेल्या व्यक्तीचा पोटाचा घेर वाढतोच. यामागचं कारण आपण पुढील लेखातून जाणून घेणार आहोत.

कॅलिफोर्नियामध्ये असलेले एम्सचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये याची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, ३० वर्षांनंतर शरीरातला मेटाबॉलिज्मचा वेग मंदावतो. त्यामुळे वजन नियंत्रणात असलं तरी पोटाचा घेर वाढतो. थोडं काम केलं तरी जास्त थकवा जाणवतो, सतत गोड खाण्याची इच्छा होते, कार्बोहायड्रेट असेलेले पदार्थ खाल्यावर पोट फुगतं आणि पोटावर चरबी साचते. याचं कारण म्हणजे तुमचे मेटाबॉलिज्म कमी झाले आहे.

Belly Fat: वयाच्या तिशीनंतरच का वाढतो पोटाचा घेर? जाणून घ्या 'चरबी' वाढण्याची ४ कारणे
Chanakya Niti: हुशार अन् चतूर महिलांमध्ये असतात हे ७ सीक्रेट, नाव कमावण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ३० वर्षांनंतर दर दहा वर्षांत ३ ते ८ टक्के स्नायू कमी होतात. स्नायू कमी झाल्याने शरीर विश्रांतीच्या अवस्थेत कमी कॅलरी बर्न करतं. कारण स्नायू शरीरातले बऱ्याच ग्लुकोजचा वापर करतात. स्नायूंचे प्रमाण कमी झाल्याने ग्लुकोज रक्तात जास्त वेळ राहते आणि ते पोटात फॅट वाढत जातो.

वाढत्या वयात इन्सुलिन सेंसिटिव्हिटीही कमी होते. त्यामुळे कार्बोहायड्रेटचं सेवन केल्यावर रक्तातली साखर वाढते, इन्सुलिन रेसिस्टन्स वाढतो आणि पोटाभोवती फॅट जमा होतो. हार्मोनल बदल हे सुद्धा एक कारण आहे. ३० नंतर ह्यूमन ग्रोथ हार्मोन, टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेनचे प्रमाण कमी होतं, तर कोर्टिसोल हार्मोन वाढते. या बदलांचा परिणाम थेट पोटातील खोल फॅट वाढण्यावर होतो.

फॅटी लिव्हर, प्री-डायबिटीज, डायबिटीज किंवा ट्रायग्लिसराइड्स वाढलेले असतील, तर पोटाची चरबी कमी होत नाही. अशा वेळेस शरीर ग्लुकोजचा योग्य वापर करू शकत नाही आणि जास्त साखर चरबीच्या स्वरूपात पोटात साठते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Belly Fat: वयाच्या तिशीनंतरच का वाढतो पोटाचा घेर? जाणून घ्या 'चरबी' वाढण्याची ४ कारणे
आता WhatsApp Chat नको असलेले डिलिट करा, हवे असलेले ठेवता येणार, नवं फीचर आलं, कटकट संपली!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com